“ एम जी व्ही मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विद्यापीठ स्तरावर झेप”
मनमाड :-महात्मा गांधी विद्यामंदीर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड,
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ दरम्यान नाशिक जिल्हा विभागीय क्रीडा समिती यांच्या मार्फत भारोत्तालन (वेट –लिफ्टिंग ) या क्रीडा स्पर्धांचे आयोजन दिनांक १६/१२/२१ रोजी मनमाड महाविद्यालय मार्फत करण्यात आले होते.सदर भारोत्तालन (वेट –लिफ्टिंग ) आंतर महाविद्यालयीन स्पर्धेसाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता. उपरोक्त स्पर्धेसाठी कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाडचा ११ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता .यात महाविद्यालयाच्या खेळाडूंच्या उत्कृष्ठ खेळाच्या जोरावर सर्व खेळाडूंची निवड श्रीरामपूर येथे होणाऱ्या आंतरविभागीय भारोत्तालन (वेट –लिफ्टिंग ) क्रीडा स्पर्धेस झाली होती सदर स्पर्धेत कु दिया व्यवहारे कु नूतन दराडे कु करून गाडे यांनी आप आपल्या वजन गटात सुवर्ण कामगिरी करत प्रथम क्रमांक प्राप्त केला व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघात आपले नाव निश्चित केले .उपोरोक्त स्पर्धेत महाविद्यालयाच्या इतर खेळाडूंची कामगिरी देखील कौतुकास्पद होती .सदर स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंनी आचार्य नागार्जुन विद्यापीठ गुंटूर येथे दिनांक २७ ते ३०/१२/२१ पार पडलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेस आपला सहभाग नोंदविला आहे . महाविद्यालयातील या विद्यार्थ्याने यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे सरचिटणीस समाजश्री डॉ.प्रशांत दादा हिरे संस्थेचे समन्वयक डॉ.अपूर्वभाऊ हिरे संस्थेच्या कोषाध्यक्षा श्रीमती स्मिताताई हिरे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.व्ही. पाटील उपप्राचार्य डॉ.पी.जी.आंबेकर,कुलसचिव समाधान केदारे, श्री प्रवीण व्यवहारे तसेच महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ दिनेश कराड व महेंद्र वानखेडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या