Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 मनमाड महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधींना  अभिवादन.

मनमाड प्रतिनिधी.

 मनमाड :- महात्मा गांधी विद्यामंदीर संचालित,कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,मनमाड येथे 30 जानेवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी व हुतात्मा दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.व्ही.पाटील व उपप्राचार्य डॉ.पी.जी.आंबेकर  यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.

  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त तसेच  देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांचे स्मरण अभिवादन करुन करण्यात आले.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ.पी.बी परदेशी यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.श्रीमती ज्योती बोडखे-पालवे यांनी स्वातंत्र्यसंग्रामातील महात्मा गांधीजींचे योगदान व हुतात्मा दिनाचे राष्ट्रभक्तीतील स्थान याविषयीची माहिती दिली. यावेळी डॉ.व्ही.टी.थोरात, डॉ.जे.वाय.इंगळे,   कार्यालयीन अधिक्षक एकनाथ अहिरे महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन करताना करोना नियमांचे पालन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या