Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 तब्बल तीन महिन्यानंतर मनमाड आगारातुन बस रवाना....



मनमाड : गेल्या तीन महिन्यांपासुन संपुर्ण राज्य भर एस टी कर्मचाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांसाठी बंद पुकरलेला आहे , या मुळे सामान्य नागरिकांच्या लालपरीचे चाके थांबलेले असुन , सामान्य प्रवाशांचे यामुळे हाल होत आहे.
   मनमाड आगारात देखील गेल्या तीन महिन्यांपासुन एस टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एकही बस आगारच्या बाहेर गेली नव्हती , आज खाजगी वाहक आणि चालक यांच्या मदतीने मनमाड ते नाशिक ही पहिली बस पोलीस संरक्षणामध्ये रवाना करण्यात आली.मनमाड हे मध्यवर्ती बस स्थानक असल्याने येथुन  नाशिकला आणि संपूर्ण राज्यामध्ये अनेक प्रवासी नियमित प्रवास करत असल्याने तीन महिन्यांपासुन हे प्रवाशी अनेक समस्यांना तोंड देत प्रवास करत आहेत , खासगी वाहन धारकांनी या गोष्टीचा फायदा घेत कोणत्याही प्रकारे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार न करता गाडी मध्ये जास्तीचे प्रवाशी बसवुन आणि प्रवासाचे दुप्पट पैसे घेऊन सामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लावली आहे.
    आज पासुन मनमाड आगारातुन खासगी वाहक आणि चालक यांचा मदतीने चार बस रवाना झाल्या असुन , लवकरच अनेक सर्व ठिकाणी बस सुरू करण्यात येतील अशी माहिती मनमाड आगार प्रमुख श्री प्रितम लाडवंजारी यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या