मनमाड रेल्वे पोलिसांची उत्कृष्ठ कामगिरी रांजणगाव एमआयडीसी तील चोरांच्या मनमाड येथे आवळल्या मुसक्या
रांजणगाव (जिल्हा पुणे) एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत जबरी चोरी करून उत्तर प्रदेशातील आपल्या गावी धावत्या रेल्वे गाडीत संशयित आरोपी पळून जात असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. रेल्वे स्थानकात शोध मोहीम सुरू केली असता उभ्या असलेल्या रेल्वेगाडीतून संशयित आरोपीला पकडण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. सदर संशयित आरोपीकडे ९० हजार रूपयांची रोख रक्कम हस्तगत करून ती रांझणगांव पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. पुणे पोलिसांकडून याबाबतची माहिती व संशयित आरोपीचा फोटो मनमाड लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही वेळातच या आरोपीला स्थानकावर थांबलेल्या रेल्वे गाडीतून ताब्यात घेतले . पुणे परिसरात चोरीची घटना घडली होती. याबाबत रांजणगांव एमआयडीसी पोलिसठाण्यामध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित आरोपी नवीन प्रदीप निषाद ( वय २२, रा. कोरापट्टी, जि. जौनपुर, उत्तरप्रदेश) याचा ठावठिकाणा घेतल्यानंतर हा आरोपी पुणे - गया या रेल्वे गाडीने गावी पळून जात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने मनमाड लोहमार्ग पोलिस स्थानकाशी संपर्क करत माहिती व संशयिताचा फोटो दिला. माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक अलर्ट झाले. उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या गाड्यांवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले. पुणे - गया ही गाडी मनमाड रेल्वे स्थानकांत उभी असतांनाच उपनिरीक्षक मधुकर लोखंडे, कर्मचारी दिनेश पवार, संतोष भालेराव, संजय केदारे, , संजय निकम, निलेश कुसराम, महिला पोलिस कर्मचारी संतोषी राठोड व पो.ह. बच्छाव आदींनी बोगीमध्ये गाडीत शोधमोहिम सुरू केली मिळालेल्यामाहितीनुसार पळून चाललेला संशयित आढळून आला असता त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे एक बॅग आणि दुसरी बॅग त्याने दुसऱ्या बोगीमध्ये लपवून ठेवली होती. या लपवलेल्या बॅगेत ९० हजार रूपयांची रोकड मिळून आली. रांजणगाव (जिल्हा पुणे) एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत जबरी चोरी करून उत्तर प्रदेशातील आपल्या गावी धावत्या रेल्वे गाडीत संशयित आरोपी पळून जात असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. रेल्वे स्थानकात शोध मोहीम सुरू केली असता उभ्या असलेल्या रेल्वेगाडीतून संशयित आरोपीला पकडण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. सदर संशयित आरोपीकडे ९० हजार रूपयांची रोख रक्कम हस्तगत करून ती रांझणगांव पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. पुणे पोलिसांकडून याबाबतची माहिती व संशयित आरोपीचा फोटो मनमाड लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही वेळातच या आरोपीला स्थानकावर थांबलेल्या रेल्वे गाडीतून ताब्यात घेतले . पुणे परिसरात चोरीची घटना घडली होती. याबाबत रांजणगांव एमआयडीसी पोलिसठाण्यामध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित आरोपी नवीन प्रदीप निषाद ( वय २२, रा. कोरापट्टी, जि. जौनपुर, उत्तरप्रदेश) याचा ठावठिकाणा घेतल्यानंतर हा आरोपी पुणे - गया या रेल्वे गाडीने गावी पळून जात असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने मनमाड लोहमार्ग पोलिस स्थानकाशी संपर्क करत माहिती व संशयिताचा फोटो दिला. माहिती मिळताच लोहमार्ग पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक अलर्ट झाले. उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्या गाड्यांवर त्यांनी लक्ष केंद्रीत केले. पुणे - गया ही गाडी मनमाड रेल्वे स्थानकांत उभी असतांनाच उपनिरीक्षक मधुकर लोखंडे, कर्मचारी दिनेश पवार, संतोष भालेराव, संजय केदारे, , संजय निकम, निलेश कुसराम, महिला पोलिस कर्मचारी संतोषी राठोड व पो.ह. बच्छाव आदींनी बोगीमध्ये गाडीत शोधमोहिम सुरू केली मिळालेल्यामाहितीनुसार पळून चाललेला संशयित आढळून आला असता त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे एक बॅग आणि दुसरी बॅग त्याने दुसऱ्या बोगीमध्ये लपवून ठेवली होती. या लपवलेल्या बॅगेत ९० हजार रूपयांची रोकड मिळून आली.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या