Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 मनमाड येथून जवळच असलेल्या नांदूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.



नांदूर या गावी जि.प.शाळेत प्रजासत्ताक दिनी गावातील बी.एस.एफ. सैन्यामध्ये कार्यरत असलेले जवान गणेश लव्हाटे यांच्या हस्ते धवजरोहन करण्यात आले तर  जवान सुनील शेरमळे व रामदास मोरे यांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

विचारपीठावर प्रमुख वक्ते प्रा.राजू लहिरे, सरपंच विनायक पाटील,ग्रामसेविका विनया वैद्य मॅडम,मुख्याध्यापक संजय वाघ,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुनील कोल्हे,भाऊसाहेब धरणे,दिपक कऱ्हे,पिंटू व्हडगर,साहेबराव धिवर,राजू पाटील,रामन चेरमले,त्रंबक केसकर वाल्मिक व्हडगर हे उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली तर प्रा.राजू लहिरे यांनी आपल्या व्याख्यानातून संविधान महती सादर केली.26 जानेवारी 1950 रोजी समता,स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय या मूल्यांनी गुंफलेलेली जगातील सर्वोच्च ठरलेली राज्यघटना अमलात आली जनतेला अर्थाने सत्ता मिळाली म्हणून आपण हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो मतदानाचा अधिकार,अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संचार स्वतंत्र्य,महिलांना हक्क अधिकार असे विविध हक्क अधिकार आपल्या सविधांनाने देऊन देशात विविध धर्म,भाषा,प्रांतात समता प्रस्थापित करून एकसंघ भारताची निर्मिती केली मात्र लोकशाहीचा अंमल पूर्णपणे होत नसल्याने त्याच लोकशाहीकडे बोट दाखविले जात आहे.जेव्हा आपल्या देशात घराघरात संविधान वाचले जाईल व राज्यघटनेची अंमल बजावणी शंभर टक्के पुर्णपणे केली जाईल तेव्हा हा आपला देश विकसित होऊन आर्थिक महासत्ताक झाल्याशिवाय राहणार नाही असे मत प्रा.लहिरे यांनी व्यक्त केले.


कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रकाश माळी यांनी तर आभारप्रदर्शन वर्षा अभोनकर यांनी केले.कार्यक्रमास श्रीमती संगीता पाटील,विद्या चलींद्रवार, कविता माळी, अनुराधा वैद्य,विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या