Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 मनमाड महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी आणि रोजगाराच्या संधी या विषयावरती ऑनलाईन वेबिनर संपन्न.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे *प्राचार्य डॉक्टर ए.व्ही. पाटील* यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा विभाग, करिअर कट्टा, रोजगार नोंदणी कक्ष विद्यार्थी विकास मंडळ आय क्यू एस. सी. आणि एक्स्पर्ट कॉर्नर अकॅडमी,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी आणि रोजगाराच्या संधी  या विषयावरती एक दिवसीय ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले या ऑनलाईन वेबिनारसाठी प्रमुख व्याख्याते म्हणून *साजिया अंजुम खान मॅडम* यांनी पीपीटी द्वारे विद्यार्थ्यांना  स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे त्यासाठी असणारे निकष, संदर्भ पुस्तके, वेळेचे व्यवस्थापन,सराव आणि सातत्य याविषयी मार्गदर्शन केले त्याच बरोबर बँक सेक्टर मधील आयबीपीएस यासारख्या परीक्षेची तयारी कशी केली पाहिजे याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले तसेच रेल्वे विभागातील विविध परीक्षा तसेच इतरही परीक्षा याविषयीही विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. यासाठी महाविद्यालयाचे आदरणीय *प्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील* यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.  या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे आदरणीय *उपप्राचार्य डॉ. पी. जी. आंबेकर सर* यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा तयारी आतापासून करावी व उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधीचा  फायदा घ्यावा असे मत व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ. सतीश तांबे सर, कार्यालयीन कुलसचिव श्री समाधान केदारे सर,  भूगोल विभाग प्रमुख प्रा. एस.आर.पगार सर , प्रा. व्ही. बी. पेढेकर मॅडम , प्रा. परदेशी सर प्रा. पी. आर. बर्डे सर तसेच इतर प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे *प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. गणेश गांगुर्डे* यांनी केले व *प्रमुख पाहुण्यांचा परिचय व आभार प्रदर्शन प्रा. देविदास सोनवणे* यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या