" हिंदी केवल भारताची नाही तर संपूर्ण जगाची भाषा "- प्रो. डॉ. किरण खन्ना.
मनमाड.महात्मा गांधी विद्यामंदिर,नाशिक संचलित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मनमाड आणि स्नातकोत्तर हिंदी विभाग व आंतरिक गुणवत्ता आश्वासन कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने दि.10 जानेवारी,2022 रोजी * "विश्व हिंदी pदिवसाच्या "निमित्ताने "प्रयोजनमूल हिंदी आणि वैश्विकता "या विषयावर राष्ट्रीय ई-वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांसाठी प्रमुख व्याख्याता म्हणून डॉ.किरण खन्ना,डीएवी कॉलेज, अमृतसर,पंजाब येथील स्नातकोत्तर हिंदी विभागाच्या विभागप्रमुख,हिंदी साहित्याच्या अभ्यासक प्रो. डाॅ.किरण खन्ना उपस्थित होत्या.त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये सांगितले की, " हिंदी साहित्यामुळे भारताची संपुर्ण जगात प्रसिद्धी आहे . हिंदी भाषेचा संपूर्ण जगात प्रचार - प्रसार करणे आपले परम कर्तव्य आहे. प्रयोजन मूलक हिंदी मुळे हिंदी आज जनसंचार व मिडियची भाषा बनली आहे. " असे मत व्यक्त केले. या प्रसंगी कार्यक्रमाचे दुसरे वक्ता डॉ.साकेत सहाय, वरिष्ठ प्रबंधक (राजभाषा) , पंजाब नैशनल बैंक, पटना यांनी "भारतीयांची ओळख ही हिंदी भाषेमुळेच आहे. असे मत स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील उपस्थित होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये असे मत व्यक्त केले की, "हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करणे ही काळाची गरज आहे. ही जबाबदारी कोणा एकाची नाही तर आपल्या सगळ्यांची आहे असे स्पष्ट केले"प्रस्तुत कार्यक्रमासाठी देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून - कर्नाटक, मद्रास, तामिळनाडू, तेलंगना, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, हरियाणा, गोवा, दिव - दमन, मुंबई, पुणे, अहमदनगर, बीड, नांदेड़, नागपुर या ठिकाणांवरुन शंभराच्यावर प्रतिभागी उपस्थित होते. सदर कार्यक्रमांसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर, नॅकचे समन्वयक डॉ. मिलिंद अहिरे, वरिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक डॉ.सतीष तांबे, कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या श्रीमती ज्योती बोडके, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. विठ्ठल फंड, कार्यालयीन कुलसचिव श्री. समाधान केदारे, अधिक्षक श्री. एकनाथ अहिरे , महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.विष्णु राठोड यांनी केले तर प्रास्ताविक, पाहुण्याचा परिचय व आभार स्नातकोत्तर हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ.राजाराम जी.शेवाळे यांनी मानले .
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या