( येवला )नाशिक.आरोग्य विभागाच्या वतीने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा कोरोना काळातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठा खारीचा वाटा असून नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने या कालावधीमध्ये आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना दरमहा एक हजार रुपये ग्रामपंचायत स्तरावरून देण्याचे जाहीर केले होते परंतु माहे एप्रिल 2020 पासून येवला तालुक्यात कुठेही आशा सेविकांना ग्रामपंचायत स्तरावरून कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेला नाही
यासंदर्भात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कृती समितीने नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांना विचारणा केली असता त्यांनी 17 /6/ 2021 रोजी गटविकास अधिकारी यांना आदेश देण्याचे पत्र काढले होते तरीही त्याअनुषंगाने मे 2020 पासून आज पर्यंत अद्यापही कोणत्याही ग्रा. प कडून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना थकित प्रोत्साहन भत्ता देण्यात आलेला नसल्याने 3 .जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी स्री मुक्ती दिवस म्हणून महिलांचा गौरव केला जातो परंतु प्रशासनाने दखल न घेतल्याने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महिलांना प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी पंचायत समिती समोर चुल मांडून प्रपंचाला लागणाऱ्या जीवनाश्यक वस्तू मांडून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला यावेळी आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटनेचे नाशिक जिल्हा संघटक विजयजी दराडे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत चुल पेटून स्वयंपाक करून आंदोलन करण्यात आले नाशिक जिल्हा संघटक विजयजी दराडे, सुनंदा परदेशी, स्वाती चव्हाण भारती बनसोडे, वाल्हुबाई जगताप, सविता आहेर, संगीता राजगुरू, वर्षा भावसार, सविता कचोलिया, यांच्यासह शेकडो आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक उपस्थित होत्या .
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या