Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 सर्वांसाठी घरे संघर्ष समन्वय समितीची आढावा बैठक संपन्न.

मनमाड प्रतिनिधी.आफरोज अत्तार.

मनमाड.शासनाच्या सर्वांसाठी घरे २०२२ योजनेअंतर्गत मागील अनेक महिन्यांपासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्याचे अवलोकन करून येणाऱ्या काळात सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्काचे ७/१२ मिळवून देण्यासाठी समितीचे *संस्थापक अध्यक्ष नगरसेवक नाजीमभाई शेख* यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये येणाऱ्या काळात करावयाच्या कामाची रूपरेषा ठरविण्यात आली तसेच या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना योजनेसंबंधी जनजागृती अभियान सुरु केले जाणार आहे. 
शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी एक *सर्वांसाठी घरे २०२२* हि योजना असून याद्वारे पात्र अतिक्रमणधारकांना त्यांचे हक्काचे ७/१२ उतारे मिळणार असून मागील दिड वर्षांपासून *नगरसेवक नाजीमभाई शेख* यांच्या नेतृत्वाखाली सर्वांसाठी घरे संघर्ष समन्वय समिती स्थापन करण्यात आली. समितीतर्फे सर्वांसाठी घरे २०२२ या योजनेची मनमाड शहरात तात्काळ अंमलबजावणी करणेसाठी शासन दरबारी पाठपुरावा मागील दिड वर्षांपासून सातत्याने सुरु असून मनमाड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नाजीमभाई यांनी हि योजना लवकरात लवकर मार्गी लावून पात्र अतिक्रमणधारकांना हक्काचे ७/१२ देण्याची ठाम  भूमिका मांडली. समितीतर्फे भूमी अभिलेख कार्यालय नांदगाव -मनमाड नगरपरिषद -प्रांत कार्यालय येवला यांच्या कामात सुसूत्रता घडवून आणली व या योजनेच्या कार्याला खऱ्या अर्थाने गती प्राप्त झाली. 
पात्र अतिक्रमणधारकांच्या जागेची मोजणी करणे अत्यावश्यक असतांना  पात्र अतिक्रमणधारक हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने पुढील कार्य मार्गी लागणेसाठी महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री मा. ना. श्री. बाळासाहेब थोरात यांना भेटीसाठी  नगरसेवक नाजीमभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ जाऊन पात्र अतिक्रमणधारकांची बाजू मांडण्यात आली यावर मंत्रिमहोदयांनी मोजणी फी कामी योग्य त्या सूचना करण्याचे आश्वासन दिले. आढावा बैठकीस समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक नाजीमभाई शेख, भीमराज लोखंडे, कयाम सैय्यद,फिरोजभाई शेख, कदीर शेख, जाहिद शेख,  सद्दाम अत्तार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या