Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 

नगरपरिषद कर्मचारी यांना व्यक्तिमत्व विकास, एम.सी.एस.आर व माहिती अधिकार बाबत 3 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन.

प्रतिनिधी.आफरोज अत्तार.


मनमाड नगरपरिषद व साई तेज लाईफ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नगरपरिषद कर्मचारी यांना व्यक्तिमत्व विकास, एम.सी.एस.आर व माहिती अधिकार बाबत 3 दिवसीय कार्यशाळेचे शहरातील गुड शेफर्ड इंग्लिश मेडियम स्कुल येथे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाचे उदघाटन मनमाड शहराचे मा. नगराध्यक्षा सौ पदमावती ताई धात्रक, मा. आमदार जगन्नाथ धात्रक, मुख्याधिकारी डॉ विजयकुमार मुंडे, साईतेज संस्थेचे संस्थापक चेअरमन सौ रूपाली आव्हाड, गुड शेफर्ड शाळेचे मुख्याध्यापक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. 


यावेळी प्रमुख वक्ते श्रीकांत घोलप, श्री राजेश खामकर यांनी कर्मचाऱ्यांना सेवेत असतांनाचे अधिकार, कर्तव्य अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कर्मचाऱ्यांना कामामुळे निर्माण होणाऱ्या ताण तणाव, अशा विविध समस्या वर मार्गदर्शन करून त्यातून मुक्ती कशी मिळवायची याबाबत मार्गदर्शन केले.


यावेळी पालिकेचे कार्यालयीन प्रमुख श्री अशोक पाईक, आस्थापना सुपरवायझर श्री राजेंद्र पाटील, लेखापाल श्री. नाना जाधव आनंद औटी, कर अधीक्षक श्री शरद बोडखे, आरोग्य निरीक्षक श्री. सोनवणे बाबासाहेब दराडे, नितीन पाटील, किरण आहेर, रामदास पगारे, कैलास पाटील, तुषार बोराडे, अनिल गवळी, राजेंद्र भाबड, मिलिंद पुरंदरे, सुशांत राजगुरु, राजू चव्हाण, नाना कुशारे, विकास गायकवाड रवी वागले, उमेश सोनवणे, संजय जगताप, रमेश थोरे, जॉर्ज स्वामी, संजय गवळी यासह नगरपरिषदेचे विविध विभागाचे 70 कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विलास कातकडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या