पाटोदा ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 6 मध्ये पोटनिवडणुकीचा राष्ट्रवादी पार्टीने नारळ वाहून प्रचाराचा बिगुल फुंकला.
प्रतिनिधी/एजाज देशमुख
पाटोदा (14 डिसेंबर 2021) संपूर्ण येवला तालुक्यात चर्चेचा विषय ठरलेली पाटोदा ग्रामपंचायतीची वार्ड क्रमांक सहा मधील पोटनिवडणुकीचा अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जागृत देवस्थान रामेश्वर मंदिराच्या सभागृहांमध्ये रामेश्वरा चरणी श्रीफळ वाहून प्रचारास सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातून अनेक कार्यकर्ते युवा कार्यकर्ते नेते गण तथा ज्येष्ठ मार्गदर्शक उपस्थित होते. यात प्रामुख्याने पाटोदा गावचे प्रथम नागरिक सरपंच प्रताप पाचपुते, ज्येष्ठ नेते साहेबराव आहेर, रमेश काका बोरणारे, अशोकराव मेंगाने, संपतराव बोरणारे, मारोतीराव घोरपडे, रियाज भाई मुलांनी, श्री. प्रभाकर बोरणारे, आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाहण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी ज्येष्ठ नेते साहेबराव आहेर, रमेश काका बोरणारे, व युवा नेते संपतराव बोरणारे यांनी ही निवडणूक का करावी लागली ती कशी करायची व कशी जिंकायची याबद्दल अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन केले.
सध्या पाटोदा ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एक हाती सत्ता आहे. वार्ड क्रमांक सहा मध्ये अनुसूचित जाती-जमातीच्या जागेवर सौ .हिराबाई सुखदेव वाघ ह्या निवडून आल्या होत्या, दुर्दैवाने त्या अल्पशा आजाराने मरण पावल्याने त्यांची जागा रिक्त झाली होती, वास्तविक ही जागा राष्ट्रवादीची असल्याने राष्ट्रवादीला ही जागा परत मिळावी या कार्यकर्त्यांच्या अग्रहा खातिर शेवटी निवडणूक घ्यावी लागली .विशेष बाब म्हणजे राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, व शिवसेना ह्या पक्षाची महाआघाडीची सत्ता आहे. परंतु गाव पातळीवर स्थानिक राजकारणात मात्र या ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी आमने सामने उभे असल्याचे चित्र रंगणार आहे. याप्रसंगी ज्येष्ठ नेते श्री. साहेबराव आहेर यांनी माननीय श्री. भुजबळ साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत पाटोदा ग्रामपंचायतीमध्ये संख्याबळ कमी होता कामा नये, तसेच ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे सत्ता राहण्यासाठी कार्यकर्त्यांनी जिद्दीने व कसोशीने प्रयत्न करून राष्ट्रवादीने दिलेल्या सौ. अलका बाळासाहेब वाघ यांची निशाणी कप बशी आहे. सौ. वाघ यांना प्रचंड मतांनी विजय करावे असे आव्हान केले. तर ही पोटनिवडणूक कार्यकर्त्यांनी सहज घेऊ नये, कारण आगामी होणाऱ्या विविध कार्यकारी सोसायटी ची निवडणूक, पंचायत समिती निवडणूक, व जिल्हा परिषद निवडणूक ,मार्केट कमिटी ची निवडणूक ,ह्या सर्व निवडणुकांची ही पोटनिवडणूक पाटोदा गावाच्या दृष्टीने नांदी ठरणार आहे असे प्रतिपादन युवा नेते श्री. संपतराव बोरनारे यांनी केले. याप्रसंगी गावातून ज्येष्ठ नेते श्री. रमेश काका बोरणारे ,श्री अशोकराव में गाणे, श्री विलास पवार ,श्री. सोमनाथ भिसे ,ग्रामपंचायत सदस्य अंकुश बोराडे, लखन पगारे, अशोक पगारे ,राहुल पगारे ,ज्ञानेश्वर जाधव ,मच्छिंद्र आहेर ,अंबादास पाटील खुळे, प्रभाकर बोरणारे, रमेश वाघ, कौतिक वाघ ,आप्पा वाघ, गणेश बैरागी , खंडू पवार ,श्री नंदकुमार में गाने, उपसरपंच श्री. रईस भाई देशमुख, अयुब भाई पठाण, युवा नेते श्री. रऊफ भाई मुलांनी, पवार ,असे अनेक कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या