मनमाड (प्रतिनिधी) : जानेवारी पत्रकार दिनानिमित्त प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियातील पत्रकारांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुका समन्वयक अमोल खरे यांनी येथे केले मराठी पत्रकार परिषद, मुंबई संलग्नित
नाशिक ग्रामीण पत्रकार संघाच्या नांदगाव तालुका पत्रकार संघाची बैठक येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आली होती यावेळी ते मार्गदर्शन करतांना बोलत होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, तर मंचावर जेष्ठ पत्रकार सुरेश शेळके उपस्थित होते पत्रकार अमोल खरे पूढे म्हणाले की नांदगाव तालुक्यात नाशिक ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे सर्वांनी एकजूट राहून कार्य करावे यावेळी
राष्ट्रीय कीर्तीचे जेष्ठ पत्रकार विनोद दुवा यांचे निधन झाले तसेच आपल्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपीन रावत आणि त्यांचे ११ साथीदार यांचे निधन झाल्याने जेष्ठ पत्रकार सतिष शेकदार यांनी शोकप्रस्ताव सादर केला पत्रकार अशोक बिदरी यांनी आलेल्या पाहुण्यांचे शब्दसुमनाने स्वागत करावे कोरोना सारख्या महामारीत कोणीही घराबाहेर नव्हते आशा काळात आपल्या स्वतःची आपल्या कुटुंबाची काळजी न करता ज्यांनी केवळ आपल्या कामावर निष्ठा ठेवून कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या मालेगाव शहरात काम केले असे झी २४ तासचे पत्रकार निलेश वाघ, एबीपी माझाचे पत्रकार अजय सोनवणे, लोकशाहीचे पत्रकार संदीप जेजुरकर यांना कोरोना योद्धा म्हणून राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचा तर
नव्याने पदार्पण करणाऱ्या साप्ताहिक ठिणगी ची सुरवात केल्याबद्दल संपादक तुषार गोयल यांचा तर मराठा सेवा महासंघाच्या नांदगाव तालुका कार्याध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार सुरेश शेळके यांची नियुक्ती तर नाशिकच्या मराठी साहित्य संमेलनात तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या संदीप देशपांडे आणि संस्कृती संवर्धन समितीच्या अध्यक्षपदी योगेश म्हस्के यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा पत्रकार संघाच्या वतीने शॉल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
बैठकीचे अध्यक्ष नरेश गुजराथी यांनी कार्यशाळेच्या नियोजनाबाबत आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थितीत सर्वांनीच आपले वेगवेगळे मते व्यक्त करत कार्यशाळा यशस्वी करण्यासंदर्भात मनोदय व्यक्त केला यावेळी नांदगाव तालुका समन्वयक तसेच अमोल खरे, जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी, सतिष शेकदार, सुरेश शेळके, निलेश वाघ, संजय मोरे, सोमनाथ घोंगाने, संदीप जेजुरकर, अशोक बिदरी, तुषार गोयल, अनिल आव्हाड, अजय सोनवणे, सॅमसंग आव्हाड, प्रीतम आहेर, नरहरी उंबरे, संदीप देशपांडे, नाना आहिरे, सुरेश नारायने, बापू जाधव, सचिन गायकवाड, बाबासाहेब काळे, रामदास सोनवणे, उपाली परदेशी, मारुती जगधने, शशिकांत पाटील, धंनजय देशमुख, आंनद बोथरा, अफरोज अत्तार, योगेश म्हस्के, निलेश व्यवहारे, रोहित शेळके, निखिल मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या