एस,टी कर्मचारी कृती समिती आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठींबा,
प्रतिनिधी: अफरोज अत्तार,
एस,टी कर्मचारी संघटना कृती समिती तर्फे विविध मागण्यांसाठी सुरू असलेले बेमुदत आंदोलनास वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा कमिटी व मनमाड शहरातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला,
महिला तालुकाध्यक्षा,ऍड आम्रपाली ताई निकम,यांनी जाहीर पाठिंबा दिला व कामगारांवर होणाऱ्या अन्याय विरुद्ध आंदोलनात वंचित बहुजन आघाडी हे सदैव सोबत राहील असे आश्वासन दिले, राज्य शासना तर्फे आंदोलनकारी एस टी कर्मचारींवर दडपशाही पध्दतीने निलंबनाची कारवाई ही चुकीची असून,निलंबन कारवाई ही तात्काळ रद्द करण्यात यावी, व कामगारांचे मांगण्या रास्त असून राज्य शासना ने मांगण्या तात्काळ मंजूर करावे अन्यथा वंचित बहुजन आघाडी तर्फे देखील आंदोलन छेडण्यात येईल, असा ईशारा जिल्हा सचिव कादिर शेख तर्फे देण्यात आला,या वेळी, जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे,जिल्हा महासचिव संतोष भोसले,शहराध्यक्ष पी आर निळे,जिल्हा नेते यशवंत बागुल,शकील शेख,नसीम शेख,इतर कार्यकर्ते उपस्तीत होते,

1 टिप्पण्या
🙏
उत्तर द्याहटवा