Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

गर्भवती महिलांसाठी स्थानिक पोषक आहार जनजागृती

 मनमाड.गर्भवती महिलांसाठी स्थानिक पोषक आहार जनजागृती.

प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार.8888509003.

 राष्ट्रीय पोषण माह 2021 एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक 2 अंतर्गत गर्भवती महिलांसाठी व बालकांसाठी स्थानिक पोषक आहार विषयक जनजागृती अंगणवाडी क्रमांक 81 मध्ये करण्यात आली. यावेळी परिसरातील गरोदर मातांना पोषक आहार यावर मार्गदर्शन करताना कडधान्य,पारंपारिक भाज्या, फळे / फळभाज्या,शेवगा तसेच डाळी, दुग्धजन्य पदार्थ, मांसाहारी पदार्थ, अंडी व तृणधान्य याविषयीचे प्रात्यक्षिक व प्रदर्शन भरवून जनजागृती करण्यात आली . असा चौरस आहार गर्भवती महिलेने घेतल्यास तिचे येणारे बालक हे सुदृढ व निरोगी जन्मास येईल व भारतातील कुपोषण कमी करण्यासाठी याचा उपयोग होईल यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडी सेविका सीमा चौधरी व मदतनीस मनिषा वाघ यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या