Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाडचे डम्पिंग ग्राऊंड पेटले; धुराच्या लोटात नागरिक गुदमरले!



मनमाड :- (प्रतिनिधी):
कचरा जाळणाऱ्याला पाच हजार रुपये दंड. अशी दवंडी पिटणाऱ्या पालिकेचे डम्पिंग ग्राऊंड तीन दिवसापासून आगीच्या विळख्यात आलेले आहे. 
 (दहेगाव) येथील मनमाड नगर परिषद क्षेत्रातील डम्पिंग ग्राऊंडला गेल्या तीन दिवसांपासून भीषण आग लागली आहे. या आगीतून निघणाऱ्या विषारी धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेबद्दल नागरिकांतर्फे संताप व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाचा 'विचित्र' कारभार: लोकांवर दंड, स्वतःला सूट?

विशेष म्हणजे, 'शहरात कुठेही कचरा जाळताना आढळल्यास पाच हजार रुपये दंड आकारण्यात येईल' अशी दवंडी कचरागाडी मार्फत रोज पिटण्यात येते. मात्र, आता स्वतः नगरपालिकेचेच डम्पिंग ग्राऊंड आगीत धगधगत असल्याने "हा नियम फक्त सामान्य जनतेसाठीच आहे का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात, डोळ्यांची आग आणि श्वसनाचा त्रास होत असल्याची तक्रार 
गेल्या ७२ तासांपासून डम्पिंग ग्राऊंडवरून निघणारा धूर वाऱ्याच्या दिशेने थेट लोकवस्तीत शिरत आहे. यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे.परिसरातील रहिवाशांच्या डोळ्यांची जळजळ वाढली आहे.संपूर्ण परिसरात दुर्गंधीयुक्त धुराचे साम्राज्य पसरले आहे.


स्थानिक नागरिकांनी खळबळजनक आरोपकरत कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांनीच ही आग लावली असावी.थेट कर्मचाऱ्यांवर संशयाची सुई केली आहे.

 उन्हाळ्याच्या तीव्रतेत ही आग अधिकच पसरत असून ती विझवण्यासाठी पालिकेकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचे चित्र दिसते असे नागरिकांतर्फे सांगण्यात येत आहे.

"आमच्यावर दंड लावण्याचे दवंडी पिटणारी नगरपालिका स्वतःच्या कचरा डेपोची आग का विझवू शकत नाही? विषारी धुरामुळे घरात राहणे कठीण झाले आहे. अशी प्रतिक्रिया संतप्त रहिवासी नागरिकांनी व्यक्त केली आहे. 

आता या प्रकरणावर मनमाड नगर पालिका प्रशासन काय कारवाई करते आणि नागरिकांना या त्रासातून कधी सुटका मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या