मनमाड | प्रतिनिधी : मनमाड नगरपरिषदेची दुसरी सर्वसाधारण सभा आज उत्साहपूर्ण आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत एकूण १३ विषयांवर सविस्तर चर्चा होऊन सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
सभेच्या प्रारंभी शहरातील मान्यवर दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. यामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य भाऊसाहेब कुशारे, एकनाथ झाल्टे आणि प्रगती कॉर्नरचे संचालक कै. कांतीलालजी ललवाणी यांचा समावेश होता. यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. नाशिक लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल नांदगावचे आमदार सुहास (अण्णा) कांदे यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच ‘नांदगाव केसरी’ किताब पटकावणाऱ्या संग्राम साईनाथ गिडगे यांचा गौरव करण्यात आला. कोविड काळात सेवेदरम्यान निधन झालेल्या कर्मचारी उमेश कुलकर्णी यांच्या वारसांना ५० लाख रुपयांचे अनुदान मिळवून दिल्याबद्दल मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांचे विशेष कौतुक करण्यात आले. याशिवाय व्यसनमुक्ती जनजागृतीबद्दल महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त सुनील वामन साळवे यांचाही सत्कार करण्यात आला.
सभेमध्ये शहराच्या विकासाला चालना देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या दलितेत्तर व वैशिष्ट्यपूर्ण योजनांअंतर्गत विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचाही ठराव मंजूर करण्यात आला.
आरोग्य विभागासाठी आवश्यक साहित्य खरेदी, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी गणवेश व जंतुनाशक खरेदी, तसेच शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविणे आणि वार्षिक दुरुस्ती कामे हाती घेण्यास सभेने मंजुरी दिली. मोकाट जनावरांच्या समस्येवर उपाययोजना म्हणून त्यांना पकडून गोशाळेत ठेवणे किंवा अन्यत्र स्थलांतरित करण्याचा विषयही चर्चिला गेला.
आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नदी-नाले स्वच्छता, तसेच आवश्यक उपाययोजनांना मान्यता देण्यात आली. नगरपरिषदेच्या साईट क्रमांक १८ वर टर्फ व मनोरंजन सुविधा विकसित करण्याचा प्रस्तावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला. आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या विविध विकासकामांना मुदतवाढ देण्यासही सभेने संमती दिली.
सभेतील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे शहरातील अतिक्रमण होता. “मनमाड सुंदर शहर” ही संकल्पना साकारण्यासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण हटवावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी दिला. नगरसेवक आमीन पटेल यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी घरकुलाचा प्रश्न उपस्थित केला, तर मयूर बोरसे यांनी नगरपरिषदेच्या गाळ्यांवरील २५ टक्के भाडेवाढ कमी करण्याची मागणी केली.
ही सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. अखेरीस राष्ट्रगीताने सभेचा समारोप करण्यात आला. सभेला नगराध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, महिला नगरसेविका तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या