मनमाड : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘संगठन सृजन अभियान’ अंतर्गत मनमाड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. काँग्रेस पक्षाचे विचार तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवणे व संघटन अधिक बळकट करणे या उद्देशाने हे अभियान देशभर राबविण्यात येत आहे.
विरोधी पक्षनेते मा. ना. राहुल गांधी यांच्या सूचनेनुसार तसेच राष्ट्रीय अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रभारी वेणुगोपाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू असून, त्यानिमित्त काँग्रेस भवन, मनमाड येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी पक्षाचे मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीस AICC निरीक्षक समिना शफिक (नवी दिल्ली), निरीक्षक मा. पद्माकर वळवी (माजी मंत्री), महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ, नाशिक उत्तर जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ कहांडोळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मनमाड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष नाजीमभाई शेख यांच्या हस्ते मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपसातील मतभेद बाजूला ठेवून संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले. आगामी काळ काँग्रेस पक्षासाठी अनुकूल असल्याचे सांगत, राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी वंचित व तळागाळातील नागरिकांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले.
या कार्यक्रमास नाजीमभाई शेख, भीमराव जेजुर, सुनील गवांदे, ऍड. फरीदा मिठाईवाला, बाळासाहेब साळुंके, अकबरभाई शेख, तौसिफ तांबोळी, सचिन पगारे, सिद्धार्थ संसारे, कॉ. रहमान शाह, ऍड. वाल्मिक मेंगाने, जगताप, शंकरशेठ बोडके, हिरामण कुसमाडे, राकेश बेदमुथा, शकीलभाई शेख, रशीद पटेल, राजू पटेल, बल्लूभाई, अफरोज शेख, अजय खरोटे, विजय दरगुळे, फय्याज कुरेशी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या