Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

कृष्णा व्यवहारे यांना राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्यपदक

 

मोदीनगर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत युथ मुलांच्या ६५ किलो वजन गटात मनमाड येथील जय भवानी व्यायामशाळेचा खेळाडू कृष्णा संजय व्यवहारे याने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक पटकावले.

कृष्णाने ११८ किलो स्नॅच व १४० किलो क्लीन अँड जर्क असा एकूण २५८ किलो वजन उचलून महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत यश संपादन केले.

त्याला प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विविध मान्यवरांनी कृष्णाचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या