Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

‘जन आवाज न्यूज’चा इम्पॅक्ट; ट्रॅफिक जामवर पोलिसांची तत्पर कारवाई, दहावी परीक्षार्थींना मोठा दिलासा

 

मनमाड प्रतिनिधी | 18 फेब्रुवारी
जन आवाज न्यूज तर्फे इंदोर–पुणे महामार्गावरील भीषण ट्रॅफिक जाम आणि त्याचा दहावीच्या विद्यार्थ्यांवर होणारा संभाव्य परिणाम याबाबत सविस्तर बातमी प्रसिद्ध होताच प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली. परिणामी, परीक्षार्थींच्या सोयीसाठी मनमाड पोलिसांनी संवेदनशील पाऊल उचलत महामार्गावरील वाहतूक तात्पुरती रोखून विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला.


मनमाड शहराच्या मध्यातून जाणारा इंदोर–पुणे महामार्ग हा वाहतूक कोंडीमुळे आधीच चर्चेत होता. रेल्वे पुलावर नादुरुस्त झालेल्या कंटेनरमुळे दोन ते तीन तास शहर ठप्प झाले होते. यामुळे विशेषतः दहावी बोर्ड परीक्षार्थींबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात होती.


विद्यार्थ्यांच्या हितासाठी पोलिसांची पुढाकार
शहरात सुरू असलेल्या दहावी शालांत परीक्षेची दोन्ही केंद्रे — सेंट झेवियर हायस्कूल मनमाड आणि एच ए के हायस्कूल मनमाड — ही महामार्गालगत असल्याने विद्यार्थ्यांना अडचणी येण्याची शक्यता होती.

ही बाब लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी पुढाकार घेत पेपर सुरू होण्याच्या सुमारे 40 ते 45 मिनिटे आधी महामार्गावरील वाहतूक रोखून ठेवण्याचा निर्णय घेतला. पोलिसांच्या नियोजनामुळे सर्व परीक्षार्थी वेळेत केंद्रावर पोहोचले आणि संभाव्य गोंधळ टळला.


आधीच्या घटनांनी वाढवली होती गंभीरता
याच महामार्गावर पूर्वी रिक्षेत महिलेची प्रसूती होणे तसेच ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या ॲम्बुलन्समुळे अपघातग्रस्त महिलेचा मृत्यू होणे अशा धक्कादायक घटना घडल्या होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच संवेदनशील बनला होता.

 
विजय करे पोलिस निरीक्षक मनमाड 

नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक
दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असल्याने केवळ ट्रॅफिकमुळे त्यांचे नुकसान होऊ नये, या भूमिकेतून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे मनमाड पोलिस.निरीक्षक विजय करे यांनी स्पष्ट केले. “ही आमची नैतिक जबाबदारी आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

मनमाड पोलिसांनी दाखविलेल्या या संवेदनशीलतेबद्दल विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांकडून मनापासून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या