Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड शहरात माणुसकी संपली?

 

मनमाड शहरात माणुसकी संपली?

मनमाड (जि. नाशिक) – मनमाड शहरातील बस स्थानकासमोर घडलेल्या धक्कादायक घटनेमुळे मनमाडकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भर दुपारी एका भीक मागणाऱ्या गरीब महिलेचा अज्ञात वाहनाने जोरदार धडक देत अपघात केला आणि चालक घटनास्थळावरून फरार झाला.

अपघातानंतर महिला गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडून होती. तिच्या शरीरातून रक्त वाहत असताना परिसरातील नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिकेला संपर्क साधला. अवघ्या शंभर मीटर अंतरावर 108 रुग्णवाहिका आलेली नाही.

नागरिकांनी तत्काळ खाजगी रुग्णवाहिकेला संपर्क साधला. असता ती देखील मनमाड शहराच्या वाहतूक कोंडीमुळे घटनास्थळी पोहोचण्यास खूप उशीर झाले. तोपर्यंत अपघातग्रस्त जखमी महिला वेदनेने रस्त्यावरच तडफडत होती.

रुग्णवाहिका आल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याने व स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत महिलेची उचल करून मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथेही तात्काळ उपचार सुरू न केल्याचा आरोप उपस्थितांनी केला आहे. जखमी महिला काही काळ बेवारस अवस्थेत पडून असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच मनमाड शहरातील काही पत्रकार बंधू रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी शहरातील समाजसेवकांशी संपर्क साधून मदतीची विनंती केली. मात्र “मनमाड उप जिल्हा रुग्णालयात सोयी उपलब्ध नाही. येथे केवळ प्राथमिक मलमपट्टीची सुविधा आहे; पुढील उपचारांसाठी मालेगाव किंवा नाशिक येथे हलवावे लागेल,” असे उत्तर मिळाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली.

दरम्यान संतप्त नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले की, “जर मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना तात्काळ व सक्षम सुविधा मिळणार नसतील, तर असे रुग्णालय नेमके कशासाठी? अशा रुग्णालयाला ‘उपजिल्हा रुग्णालय’ म्हणण्यापेक्षा त्याचे नाव बदलून ‘झोलाछाप रुग्णालय’ किंवा ‘प्राथमिक रुग्ण तरफडं केंद्र’ करावे.” अशी मागणीही नागरिकांनी केली आहे.
या घटनेमुळे काही गंभीर प्रश्न समोर आले आहेत —
अपघात करणाऱ्या वाहनचालकाचा शोध लावून कारवाई झाली पाहिजे. 

108 रुग्णवाहिकेला संपर्क करून ती का आली नाही ही चौकशी झाली पाहिजे. 

रुग्णालयात तातडीचे उपचार तत्काळ का सुरू झाले नाहीत?

मनमाडसारख्या वाढत्या शहरात सक्षम आरोग्य सुविधा का उपलब्ध नाहीत?

एक गरीब, बेघर महिला रस्त्यावर तडफडत असताना प्रशासन, आरोग्य व्यवस्था आणि समाजाची संवेदनशीलता कुठे हरवली होती, असा संतप्त सवाल मनमाडकर करत आहेत.ही घटना केवळ अपघात नसून, शहराच्या आरोग्य व्यवस्थेवर आणि समाजातील माणुसकीवर प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरली आहे. मनमाड शहरात माणुसकी संपली की काय, असा सवाल आता प्रत्येकाच्या मनात उमटत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या