Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

विश्वविक्रमाचा प्रयत्न रानी लक्ष्मीबाई कार्यक्रमांतर्गत १५ लाख मुलींना आत्मरक्षण प्रशिक्षण

 

विश्वविक्रमाचा प्रयत्न रानी लक्ष्मीबाई कार्यक्रमांतर्गत १५ लाख मुलींना आत्मरक्षण प्रशिक्षण

मुलींच्या सशक्तीकरणासाठी मंत्री दादासाहेब भुसे यांचा ऐतिहासिक उपक्रम

महाराष्ट्र शिक्षण परिषद मंडळ (MPSP) यांच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या रानी लक्ष्मीबाई आत्मरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रभरातील सुमारे १५ लाख मुलींना आत्मरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, या उपक्रमातून विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न करण्यात येत आहे.

हा उपक्रम माननीय मंत्री दादासाहेब भुसे यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राबवण्यात येत असून, राज्यातील मुलींच्या सुरक्षितता, आत्मविश्वास व सशक्तीकरणासाठी हा एक क्रांतिकारी टप्पा मानला जात आहे.

या ऐतिहासिक कार्यक्रमामुळे मुलींना आत्मसंरक्षणाचे तांत्रिक प्रशिक्षण मिळणार असून, समाजात सुरक्षिततेबाबत सकारात्मक जागृती निर्माण होणार आहे.
 मंत्री दादासाहेब भुसे यांचे मत

“आमच्या मुलींचे सशक्तीकरण आणि सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.

या उपक्रमातून महाराष्ट्र देशासमोर एक आदर्श निर्माण करेल.”

राज्यात आतापर्यंत राबवण्यात आलेल्या आत्मरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमांपैकी हा सर्वात मोठा उपक्रम असून, युवतींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचे ठोस उदाहरण ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या