मनमाड (नाशिक): मनमाड येथे तालुका झोनच्या वतीने मनमाड, चांदवड आणि नांदगाव विभागीय झोनचे मनमाड येथे नुकताच दोन दिवसीय इज्तेमा अतिशय यशस्वीरीत्या पार पडला. हा सोहळा केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक एकता, शिस्त आणि मानवतेचा एक आदर्श वस्तुपाठ समाजासमोर ठेवणारा ठरला.
हजारो मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीतही कार्यक्रमात कुठेही गोंधळ दिसला नाही, हे याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य मानले जात आहे.कार्यक्रमात सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीन सत्रांमध्ये विविध विषयांवर 'बयान' (प्रवचन) देण्यात आले. मुख्य मार्गदर्शक मौलाना मुफ्ती साहेब यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले की, "अल्लाहने मानवाला जन्म का दिला, याचे आत्मचिंतन करणे अत्यंत गरजेचे आहे. चांगली वागणूक ठेवली तर ईश्वर प्रसन्न होतो. कोणाचाही द्वेष करू नका, आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या. इतरांना मदत करा – हाच खरा धर्म आहे. आई-वडिलांची सेवा करणे म्हणजे स्वर्गाचे द्वार उघडण्यासारखे आहे. आणि इतरांच्या कामी येणे हाच यशस्वी जीवनाचा मार्ग आहे."
इज्तेमाच्या यशाचे श्रेय स्थानिक मुस्लिम बांधवांना जाते. पार्किंगपासून ते राहण्याच्या व्यवस्थेपर्यंत सर्व काही मनमाडच्या मुस्लिम बांधवांनी उत्कृष्टरीत्या सांभाळले. Volunteer (स्वयसंघ कार्यकर्ते )यांनी ट्रॅफिक व्यवस्थेतही मोलाची मदत केली, यामुळे प्रशासनावर कोणताही भार पडला नाही. हजारो लोकांच्या गर्दीतही सादगी आणि शिस्त कायम राहिली, हे पाहून उपस्थित सर्वजण प्रभावित झाले.
हा इज्तेमा समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे. धार्मिक कार्यक्रम कसा शांततेने आणि शिस्तबद्धपणे आयोजित करता येतो, याचा हा उत्तम नमुना आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात एकता आणि सद्भावना वाढते, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला. समाजातील सर्व घटकांनी अशा कार्यक्रमांचे कौतुक करावे आणि त्यातून प्रेरणा घ्यावी, अशी अपेक्षा आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या