मनमाड, दि. ७ जानेवारी :श्री आनंद धर्मार्थ दवाखाना आणि एस.एम.बी.टी. हॉस्पिटल इगतपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरास रुग्णांनी भरघोस प्रतिसाद दिला. गरीब व गरजू रुग्णांसाठी पूर्णतः मोफत असलेल्या या शिबिरात नेत्र, ईएनटी, हृदयरोग आणि सामान्य शस्त्रक्रिया तपासणीचा समावेश होता.
शिबिरात एकूण १०२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी ७४ रुग्णांची नेत्र तपासणी तर २८ रुग्णांची ईएनटी तपासणी करण्यात आली. यात १७ मोतीबिंदूचे रुग्ण, १० ईएनटी शस्त्रक्रियेचे रुग्ण, ३ सामान्य शस्त्रक्रियेचे आणि ४ हृदयरोगाचे रुग्ण आढळून आले. या सर्व रुग्णांना पुढील उपचारांसाठी एस.एम.बी.टी. हॉस्पिटल, इगतपुरी येथे पाठवण्यात आले.
स्व. रोटेरियन डॉ. सी.एच. बागरेचा यांच्या प्रेरणेने गेल्या तीन वर्षांपासून दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आयोजित केले जाणारे हे कायमस्वरूपी नेत्र चिकित्सा शिबिर मागील तीन महिन्यांत रोटरी आय हॉस्पिटल मालेगावच्या सहकार्याअभावी थांबले होते. मात्र, दवाखान्याचे सचिव श्री सचिन लुनावत यांच्या दीर्घ प्रयत्नांमुळे आणि एस.एम.बी.टी. हॉस्पिटलच्या मौलिक सहकार्यामुळे हे शिबिर पुन्हा सुरू झाले.
शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्री मनमाड श्री संघाचे संघपती श्री रिखबचंदजी ललवाणी, सुराणा ट्रस्टचे अध्यक्ष श्री पोपटलालजी सुराणा आणि डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष ज्येष्ठ सहकारी डॉ. सागरमलजी जैन यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यांनी या सेवाकार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
योगायोगाने हा दिवस मनमाडचे सेवा भावी उद्योगपती स्व. संपतलालजी सुराणा यांची ९८वी जन्मतिथी होती. त्यांना श्रद्धांजली वाहत त्यांच्या नावाने मिती रुग्णसेवेच्या स्वरूपात स्वीकारण्यात आली. तसेच स्व. सौ. भारतीबाई सागरमलजी लुनावत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मिती स्वीकारून भावपूर्ण श्रद्धासुमन अर्पण करण्यात आले.
जैन शासनाच्या "रुग्ण सेवा प्रथमं कर्तव्यम्" या संदेशाला अनुसरून गरीब-गरजूंच्या आरोग्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, रुग्णसेवा अबाधित सुरू ठेवण्याची ग्वाही श्री आनंद धर्मार्थ दवाखान्याने दिली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या