डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक परिषदेला अभिवादन – १५ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य आयोजन
मनमाड | प्रतिनिधी मनमाड शहराला सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात एक नवा ऐतिहासिक मान मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १२ व १३ फेब्रुवारी १९३८ रोजी मनमाड येथे मागासवर्गीय रेल्वे कामगार परिषद घेऊन सामाजिक परिवर्तनाची मशाल पेटवली होती. त्या ऐतिहासिक घटनेच्या वर्धापन दिनानिमित्त उत्तर महाराष्ट्र विभागीय पहिले विद्रोही मराठी साहित्य संमेलन रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी मनमाड, जिल्हा नाशिक येथे आयोजित करण्यात येत आहे.
या ऐतिहासिक संमेलनाच्या मुख्य संयोजकपदी प्रा. डॉ. जे. वाय. इंगळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत राज्य उपाध्यक्ष अर्जुन बागुल यांनी दिली. ☝️व्हिडिओ बाईट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या बैठकीत इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवरही नियुक्त्या करण्यात आल्या असून —
🔹 खजिनदार: कॉ. रामदास पगारे व संजय शिरूड 🔹 कार्यवाहक: कॉ. अंबादास निकम व महेंद्र चौथमल 🔹 उपाध्यक्ष: प्रविण पगारे व अशोक पाईकराव तसेच नरेंद्र कांबळे, पुरुषोत्तम (बापू) सव्वाखडे, श्रीकृष्ण पगारे, शशी आढोकर आदींचीही विविध पदांवर निवड करण्यात आली आहे.
संमेलनाचे स्थळ, स्वागताध्यक्ष, कार्याध्यक्ष व संमेलनाध्यक्ष यांची नावे लवकरच स्थानिक नियोजन समिती जाहीर करणार आहे.
हे संमेलन सामाजिक सलोखा, धर्मनिरपेक्षता, समता, बंधुता आणि माणुसकीचा प्रवाह अधिक व्यापक करणारे ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. साहित्यप्रेमी, रसिक, कलावंत आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या ऐतिहासिक संमेलनाला यशस्वी करावे, असे आवाहन अमिन नवाब शेख व कामगार नेते सतीश केदारे यांनी केले.
या पत्रकार परिषदेला प्रा. डॉ. जे. वाय. इंगळे, रामदास पगारे, गुरुकुमार निकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या