मनमाड .भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने जमीयत उल्मा-ए-हिंद, मनमाड यांच्या वतीने शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. देशसेवा व सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या रक्तदान शिबिरात तरुण, सामाजिक कार्यकर्ते, कार्यकर्ते तसेच विविध स्तरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून स्वेच्छेने रक्तदान केले. “रक्तदान हे श्रेष्ठदान” या भावनेतून अनेक युवकांनी प्रथमच रक्तदान करत सामाजिक जबाबदारीचे भान जपले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आयोजकांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करत देशाच्या एकता, अखंडता व मानवतेच्या सेवेसाठी प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे, असे आवाहन केले. वैद्यकीय तज्ञ व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व आवश्यक आरोग्य तपासणी करून सुरक्षित पद्धतीने रक्तसंकलन करण्यात आले.
जमीयत उल्मा-ए-हिंद मनमाड यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल उपस्थित मनमाड नगर परिषद नगराध्यक्ष योगेश पाटील. नगरसेवक सादिक पठाण. माजीद शेख. मुश्ताक कुरेशी. सह अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे सातत्य राखण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या वेळी जमीयत उल्मा ए हिंद मनमाड मौलाना तौसिफ़ आलमगिरी. मौलाना कामील. हाफिज जाकीर.कादीर अब्बास शेख,कयाम सैय्यद, .शकील शेख. इमरान सर, शोहेब तांबोळी. ओसामा शेख,इमरान कादरी, वसीम खान, फिरोज शेख.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या