मनमाड :- दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वाहनधारक उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठी प्रयत्नशील असताना मनमाड शहरात मात्र या प्रक्रियेत मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून येत आहे. शासकीय मान्यतेने तयार होणाऱ्या एचएसआरपी नंबर प्लेटच्या कामात ठेकेदारांची हलगर्जीपणा व निष्काळजीपणा समोर आला असून, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महिनाभरापूर्वी शुल्क भरून नोंदणी केलेल्या अनेक वाहनधारकांना अद्याप नंबर प्लेट मिळालेल्या नाहीत. काही वाहनधारकांना चुकीच्या प्रकारच्या प्लेट दिल्या गेल्याने पुन्हा नोंदणी व प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
मनमाड येथे नेमण्यात आलेले एचएसआरपी सेंटरही सध्या बंद अवस्थेत आहे. मालेगाव येथून नंबर प्लेट तयार होऊन येणार असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र गेल्या महिनाभरापासून एकही प्लेट पोहोचलेली नसल्याने वाहनधारकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत.
वाहनांची संख्या मोठी असताना मनुष्यबळ अपुरे असल्याने मागील सहा महिन्यांतील अनेक अर्ज अजूनही प्रलंबित आहेत. शासनाने ३१ डिसेंबरपर्यंत सर्व वाहनांवर एचएसआरपी बसवणे बंधनकारक केले असून, मुदतीत नंबर प्लेट न बसवल्यास मोटार वाहन कायदा १९८८ अंतर्गत एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे ठेकेदारांच्या निष्काळजीपणाचा आर्थिक फटका सामान्य नागरिकांना बसणार आहे.
मालेगाव येथील ठेकेदाराने मनमाड येथे एका व्यक्तीस काम दिले होते; मात्र भाडे व वेतन न दिल्यामुळे संबंधित व्यक्तीने एचएसआरपी सेंटर बंद केले आहे. दुकानावर ठेकेदाराचा संपर्क क्रमांक लावलेला असला तरी फोन केल्यावर कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे वाहनधारकांनी सांगितले.
नागरिकांनी या प्रकरणात परिवहन विभाग व जिल्हा प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा, दोषी ठेकेदारावर कारवाई करावी आणि वाहनधारकांना न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे.
“शासनाने नियम बनवले असतील तर ते राबवण्याची जबाबदारीही शासनाचीच आहे. ठेकेदारांच्या गलथान कारभारामुळे सामान्य माणसावर दंडाची तलवार चालणार नाही,” अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या