Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड शहर वाहतूक कोंडीत गुदमरतेय!बायपासचा प्रश्न ऐरणीवर – नागरिकांचा संयम सुटण्याच्या मार्गावर

 

मनमाड (प्रतिनिधी):
मनमाड–इंदूर (पुणे–इंदूर) महामार्ग, नाशिक–जळगाव व मालेगाव–नगर हे तीनही महत्त्वाचे मार्ग मनमाड शहरातूनच जात असल्याने शहर सध्या अवजड वाहनांच्या ताणाखाली अक्षरशः गुदमरले आहे. खराब रस्ते, अरुंद मार्ग, सतत नादुरुस्त होणारे कंटेनर आणि अपघातांमुळे अनेक तास वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार नित्याचे झाले आहेत.

शहरातून जाणाऱ्या महामार्गावर दिवस-रात्र अवजड वाहतूक सुरू असल्याने सामान्य नागरिक, रुग्णवाहिका, विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी सर्वच जण कोंडीत अडकत आहेत. प्रवाशांचा अमूल्य वेळ वाया जात असून मानसिक तणावही वाढत आहे.

बायपासशिवाय पर्याय नाही!

स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून मनमाड बायपास रस्त्याची मागणी सातत्याने करत आहेत. मात्र प्रत्यक्षात अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.

महामार्गावरील खड्डे, बेशिस्त वाहतूक, आणि रस्त्यांवरील मोकाट जनावरे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. लहान मुले, वयोवृद्ध व रुग्ण अडचणीत
शाळा, महाविद्यालये, दवाखाने, बाजारपेठा ओलांडून जाणारा महामार्ग हा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी मोठा धोका ठरत आहे.रस्ते ओलांडताना अपघातांची भीती, रुग्णवाहिका अडकून पडणे, शालेय विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचता न येणे – ही रोजचीच कथा बनली आहे.

 वेळ वाया – विकास थांबतोय

वाहतूक कोंडीमुळे केवळ वेळच नाही तर शहराचा आर्थिक आणि सामाजिक विकासही खुंटत आहे.
व्यापार, शिक्षण, आरोग्य सेवा आणि दैनंदिन जीवनावर याचा मोठा परिणाम होत आहे.आता तातडीने निर्णय हवा!मनमाडसारख्या महत्त्वाच्या जंक्शन शहरासाठी बायपास रस्ता हा लक्झरी नाही, तर गरज आहे.

राज्य सरकार, सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.मनमाड शहराची वाहतूक समस्या आता फक्त चर्चा न राहता कृतीची मागणी करत आहे!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या