Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

जमीयत उल्मा ए हिंद मनमाड तर्फे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 

मनमाड | प्रतिनिधी
जमीयत उल्मा ए हिंद, मनमाड तर्फे मदरसा सिद्दीकी ए अकबर, मनमाड येथे 77 वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व राष्ट्रीय एकात्मतेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध धर्मगुरू मुफ्ती असीम मुलतानी यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकावण्यात आला.


या प्रसंगी लहान लहान चिमुकली मुले मोठ्या उत्साहाने उपस्थित होती. राष्ट्रध्वजास मानवंदना देत
 राष्ट्रगीत करण्यात आले. भारताच्या संविधानिक मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त करण्यात आली. विविध समाजघटकातील नागरिकांची उपस्थिती ही राष्ट्रीय सलोखा व एकतेचे प्रतीक ठरली.

कार्यक्रमास मनमाड नगरपरिषदेचे नूतन नगराध्यक्ष योगेश पाटील, मुख्य अधिकारी शेषराव चौधरी,माजी नगराध्यक्ष राजेंद्र अहिरे.उपनगराध्यक्ष मुकुंद एळींजे. नगरसेवक अमजद भाई पठाण, नगरसेवक मुस्ताक कुरैशी. लोकेश साबळे, बाळा सांगळे  यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जमीयत उल्मा ए हिंद मनमाडचे अध्यक्ष मौलाना तोसिफ आलमगिरी.सचिव कादिर शेख, फिरोज शेख, कयाम सैय्यद. यांच्यासहमुफ्ती आसिम साहब, मौलाना कामिल सा, मौलाना वसीम साहब, हाफिज़ साजिद सा, हाफिज आसिफ सा, हाजी युनुस अमीर साहब, हाजी इकबाल सा, इम्रान सर, इम्रान कादरी सा, वसीम दिलशेर  खान, युनुसभाई, रियाज भाई,शोएब तांबोली

 संघटनेचे सह पदाधिकारीही मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व मान्यवरांनी संविधान, लोकशाही, बंधुता आणि देशप्रेम यावर आपले विचार मांडले.

हा कार्यक्रम धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक सौहार्दाचा संदेश देणारा ठरला. “भारताची खरी ताकद विविधतेत असून सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी काम करणे आवश्यक आहे,” असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या