मनमाड : मनमाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य ‘भीमसृष्टी’ उभारण्याचे स्वप्न आता लवकरच प्रत्यक्षात उतरणार आहे. नांदगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुहास (आण्णा) कांदे यांनी गेल्या वर्षी भीमसैनिकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी मोठी झेप घेतली असून, मनमाड नगरपरिषदेने १३ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रशासकीय ठराव करून वाघदर्डी धरण परिसरात २ एकर जागा ‘भीमसृष्टी’साठी मंजूर केली आहे.
महायुतीच्या प्रचार सभेत शिवसेना नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी २४ नोव्हेंबर रोजी मनमाडमध्ये याच भीमसृष्टीच्या उभारणीला पुन्हा एकदा हिरवा कंदील दाखवला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज (बुधवार) आमदार सुहास कांदे यांच्या वैयक्तिक निधीतून वॉल कंपाऊंड उभारणीच्या कामाला गती देण्यासाठी मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. शेषराव चौधरी यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान (दादा) खान, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले, अमोल दंडगव्हाळ, विशाल पगार आदी मान्यवर उपस्थित होते.
भीमसैनिकांसह मनमाडकरांच्या मनात घर करून असलेली ‘भीमसृष्टी’ आता केवळ काही महिन्यांवर येऊन ठेपली असल्याने शहरात आनंदाचे वातावरण आहे. आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या विकासकामांना मिळालेल्या यशाचे मनमाडकर कौतुक करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या