मालेगाव प्रतिनिधी दिनांक : २५ नोव्हेंबर २०२५मालेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळील गिरणा नदीवरील केटीवेअर बंधाऱ्याजवळ सोमवारी (२४ नोव्हेंबर) दुपारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. बंधाऱ्यावरून चालताना एका २४-२५ वर्षीय तरुणाला अचानक चक्कर आल्याने तोल जाऊन तो थेट खोल पाण्यात कोसळला. पाण्याची खोली प्रचंड असल्याने आसपास असलेल्या नागरिकांना मदत करता आली नाही. अखेर तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
घटनेची माहिती मिळताच मालेगाव महानगरपालिकेचे प्रसिद्ध जलतरणपटू आणि बचावकार शकील तैराक यांच्या टीमने त्वरेने घटनास्थळी धाव घेतली. खोल पाण्यात आणि प्रतिकूल परिस्थितीतही शकील यांनी धैर्याने शोधमोहीम राबवली आणि सुमारे दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. मृतदेह तात्काळ मालेगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला; मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांनी तपासणीअंती त्यास मृत घोषित केले.
मृत तरुणाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. हे ठिकाण यापूर्वीही अनेक जीव घेणारे ठरले आहे. गेल्या काही वर्षांत याच केटीवेअर बंधाऱ्यावर आणि परिसरात १५ पेक्षा जास्त जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरीही हौसेने, फोटो काढण्यासाठी किंवा फिरायला येऊन अनेकजण बंधाऱ्यावर चालतात, सेल्फी घेतात. प्रशासनाने वारंवार सूचना, फलक आणि आवाहन करूनही नागरिकांची बेफिकिरी कमी होताना दिसत नाही.
या घटनेनंतर मालेगावचे पोलीस उपअधीक्षक आणि महापालिका आयुक्तांनी पुन्हा एकदा नागरिकांना कळकळीचे आवाहन केले आहे की, “केटीवेअर बंधारा आणि गिरणा नदीचा हा परिसर अत्यंत धोकादायक आहे. पाण्याची खोली आणि वेग येथे जीवघेणा आहे. कृपया अनावश्यक वावर, सेल्फी, फिरणे पूर्णपणे टाळा. आपला आणि कुटुंबियांचा जीव धोक्यात घालू नका."
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या