Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

नाशिक : संविधान दिन उत्साहात साजरा; बौद्ध-मुस्लिम बंधूंनी एकत्र येऊन केले उद्देशिकेचे सामूहिक वाचन

 

नाशिक : संविधान दिन उत्साहात साजरा; बौद्ध-मुस्लिम बंधूंनी एकत्र येऊन केले उद्देशिकेचे सामूहिक वाचन

नाशिक, दि. २६ नोव्हेंबर २०२५ : भारतीय राज्यघटनेच्या ७६ व्या अंगीकृत दिनानिमित्त (संविधान दिन) अशरफी सोशल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, नाशिकच्या वतीने इगतपुरी चाळ, सारडा सर्कल येथील मुख्यालयात अतिशय उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बौद्ध आणि मुस्लिम बांधव तसेच संविधानवादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

कार्यक्रमाची सुरुवात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व संविधान वंदनाने झाली. त्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे (Preamble) सामूहिक वाचन केले. हा क्षण उपस्थितांना भावुक करणारा ठरला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फिरोज हाजी शब्बीर खान होते, तर उपाध्यक्ष सुनिल गोविंदराव निकाळजे, सरचिटणीस भारद्वाज यादवराव पगारे, खजिनदार नावेद जावेद शेख यांच्यासह मनिष तिवडे, शाहबाज शेख, हाशिम खान, नंदकुमार निकाळे, अनवर पठाण, अरबाज शेख, मोहसिन शेख, सुफियान काझी, आसिफ शहा, समिर शेख, एजाज शेख, आवेज शेख, रजा कुरेशी, आमिन खान, रुस्तम पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी मार्गदर्शनपर भाषणांतून संविधान दिनाचे महत्त्व, भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या संवैधानिक मूल्यांचे आचरणात आणण्याचे आवाहन करण्यात आले. 

“जाती-जातीत भेदभाव व तेढ निर्माण न करता सर्वांनी एकत्र गोळ्या-गोविंदाने राहावे, संविधानाने दिलेल्या मूल्यांना जपावे,” असे सर्व वक्त्यांनी ठामपणे सांगितले.

संविधानाच्या मूल्यांवर आधारित समाज घडविण्याचा निर्धार व्यक्त करीत कार्यक्रमाची सांगता झाली. बंधुता आणि ऐक्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम नाशिककरांसाठी प्रेरणादायी ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या