Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड नगरपालिका निवडणूक २०२५ : सर्वेक्षणात शिवसेनेला प्रचंड पाठिंबा; बबलू पाटील यांच्यावर सर्वाधिक विश्वास !


मनमाड, २९ नोव्हेंबर २०२५ (विशेष प्रतिनिधी)आगामी २०२५ च्या मनमाड नगरपालिका निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ‘सिव्हिक लेंस रिसर्च अँड कन्सल्टिंग’च्या सर्वेक्षणाने राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. शहरातील तब्बल ८,००० नागरिकांच्या मोठ्या नमुन्यावर आधारित हा सर्वेक्षण शिवसेना (शिंदे गट) साठी अत्यंत दिलासादायक तर इतर पक्षांसाठी धोक्याची घंटा ठरला आहे

Download PDF file link ☝️

सर्वेक्षणातील ठळक निष्कर्ष :

- सर्वाधिक विश्वासार्ह उमेदवार : मनमाडकरांनी स्थानिक समस्या सोडवण्यासाठी बबलू पाटील (शिवसेना-शिंदे गट) यांच्यावर सर्वाधिक विश्वास दाखवला. विश्वासाच्या पाय-चार्टमध्ये बबलू पाटील यांना सर्वात मोठा वाटा मिळाला.



- आमदारांच्या कामांना कौतुक : आमदार सुहास कांदे यांनी केलेल्या कामांपैकी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन पाणीपुरवठा योजना.” ही कामगिरी मतदारांना सर्वाधिक आवडली. त्याखालोखाल “मनमाड स्विमिंग पूल” आणि “महिलांसाठी MIDC मध्ये नोकरी निर्मिती” या कामांना भरघोस पसंती मिळाली.

- मतदानाचा कल : जर आज निवडणूक झाली तर शिवसेना (शिंदे गट)ला प्रचंड बहुमत मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्षांचा एकत्रित वाटा नगण्य दिसतो आहे.

मतदानाच्या कलानुसार (प्रतिशत)  

शिवसेना (शिंदे गट) : सर्वाधिक वाटा (सर्वेक्षणात आघाडीवर)  ६६.१%

महायुती/इतर : BJP – ६.५%, NCP (अजित पवार) – १.२%  

मविआ : NCP-SP – ०.३%, शिवसेना-UBT – ५.४%

सर्वेक्षणाचे विश्लेषण करणारे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक म्हणाले,  

“मनमाडमध्ये विकास आणि विश्वास या दोन्ही निकषांवर शिवसेना (शिंदे गट) अतिशय मजबूत स्थितीत आहे. पाणीप्रश्न, रोजगार आणि क्रीडा सुविधा या तिन्ही मुद्द्यांवर जनतेने ठामपणे शिवसेनेच्या बाजूने कौल दिला आहे.”

या सर्वेक्षणामुळे मनमाडच्या राजकारणात शिवसेना (शिंदे गट)ची स्थिती अतिशय बुलंद झाल्याचे दिसते आहे. २०२५ च्या नगरपालिका निवडणुकीत मनमाडवर पुन्हा एकदा भगवा फडकण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या