Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाडमध्ये शिवसेनेचा विराट जाहीर सभा: उड्डाणपूल, भीमसृष्टी, नमो उद्यानासह विकासाच्या घोषणांचा पाऊस!

 

मनमाड (नाशिक) : मनमाड येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित प्रचंड जनसमुदायाच्या विराट जाहीर सभा बोलताना शिवसेनेचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनमाड-नांदगाव नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना अभूतपूर्व मताधिक्याने विजयी करण्याचे भावनिक आवाहन केले.

“तुम्ही प्रचाराचा नारळ फोडण्यापूर्वीच गुलाल उधळला! कारण आधीच सात नगरसेवक शिवसेनेचे बिनहिशेब सभागृहात दाखल झाले आहेत,” असे सांगताना उपस्थित हजारो कार्यकर्ते टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले. भाजपा आणि आरपीआयची पूर्ण ताकद शिवसेनेला मिळाल्याने मनमाड आणि नांदगाव या दोन्ही नगर परिषदांमध्ये भगवा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेचे अधिकृत उमेदवार :

- मनमाड नगराध्यक्षपद – योगेश पाटील  

- नांदगाव नगराध्यक्षपद – सागर हिरे  

“ही दोन्ही नगरे सुहास कांदे साहेबांनी अतुलनीय विकासाची उंची गाठून दिली आहेत. पाणीप्रश्न जवळपास संपला, भव्य शिवसृष्टी उभी राहिली, आता भीमसृष्टी उभारायची आहे – त्यासाठी निधी मी नक्की देणार!” अशी ग्वाही देत मा.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी पुढे सांगितले, 

 

“मनमाडला ट्रॅफिकमुक्त करण्यासाठी उड्डाणपूलाची जुनी मागणी पूर्ण करणार, त्यासाठीही निधी नक्की देऊ. शहरातील ईदगाहचा प्रश्नही लवकरच मार्गी लावू.” 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या ‘नमो उद्यान’ योजनेअंतर्गत प्रत्येक नगर परिषदेला १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, मनमाडमध्ये अतिशय सुंदर असे उद्यान लवकरात लवकर उभे करावे यासाठी प्रस्ताव तात्काळ पाठवावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

बिनविरोध विजयी झालेल्या सात नगरसेवकांचे जोरदार अभिनंदन करताना मंचावर उपस्थित आमदार सुहास कांदे, सौ. अंजुम कांदे, शिवसेना-भाजपा-आरपीआयचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा उत्साह गगनाला भिडला.

मनमाड-नांदगावकरांनो,आता फक्त एकच हाक –  “योगेश पाटील-सागर हिरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा… भगवा झेंडा दोन्ही नगर परिषदांवर फडकवा!” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या