नाशिक/येवला, २४ नोव्हेंबर २०२५ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कंबर कसली असतानाच येवला विभागाने रविवारी (२३ नोव्हेंबर) रात्री मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी ४९ लाख रुपयांचा बनावट मद्यसाठा जप्त केला आहे.
नगर-मनमाड रोडवरील गोपाळवाडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत सावरगांव शिवारात गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यात ९६० सिलबंद काचेच्या बाटल्या (१८० मि.ली.) प्रथमदर्शनी बनावट वाटणाऱ्या ‘रॉयल स्टॅग व्हिस्की’ (छापील किंमत प्रत्येकी २५० रुपये) जप्त करण्यात आल्या, ज्याची बाजारभाव किंमत सुमारे २ कोटी ४० लाख रुपये आहे.
याशिवाय आरोपींकडून - महिंद्रा पिकअप (MH-15 EG-3480) – अंदाजे ५.२५ लाख - स्विफ्ट डिझायर कार (MH-01 BY-2271) – अंदाजे ६ लाख - प्लॅटिना दुचाकी (MH-15 HL-5059) – अंदाजे ७५ हजार - ५ मोबाईल फोन – अंदाजे ५० हजार असे एकूण १४ कोटी ९०० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक केलेले आरोपी (सर्व रा. येवला तालुका): 1. जालिंदर मनोहर गोडसे (वय २६, विखरणी) 2. रामदास साहेबराव होन (वय ४१, विखरणी) 3. सुनिल वाळू खुरसणे (वय २८, विखरणी) 4. सद्दाम कासम शाह (वय २८, विखरणी) 5. समाधान विक्रम भुसारे (वय २६, पाटोदा)
कारवाईचे नेतृत्व निरीक्षक प्रकाश घायवट यांनी केले असून दुय्यम निरीक्षक प्रवीण मंडलिक, अवधूत पाटील व जवान मुकेश निर्वेकर, संतोष मुंढे, सुनिल टापरे, चालक दीपक नेमणार आदींनी सहभाग घेतला. ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक अमृत तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.
निवडणूक कालावधीत अवैध मद्यवाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग सतर्क असून जनतेला अवैध मद्याची माहिती देण्यासाठी टोल फ्री क्र. १८०० ८३ ३३३३, व्हॉट्सअॅप ८४२२०० ११३३ किंवा ०२५३-२५८१०३३ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या