मालेगाव : मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे अल्पवयीन चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचार व हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या पीडित कुटुंबाला भेट देण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेना, लोकशाही धडक मोर्चा, संविधान आर्मी तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने डोंगराळे गावात दाखल झाले. यावेळी त्यांनी कुटुंबाचे सांत्वन करून आरोपीला तात्काळ फाशी देण्याची व राज्यात चिमुकऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस धोरण आणण्याची मागणी केली.
मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांना निवेदन देऊन संघटनांच्या शिष्टमंडळाने पीडित कुटुंबाची भेट घेतली. यावेळी बोलताना संघटनेचे नेते दीपक भाई केदार म्हणाले,
“आरोपीचा आतापर्यंत एन्काऊंटर झाला पाहिजे होता किंवा फास्ट ट्रॅक कोर्टातून लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हायला हवी. हे लेकरू परत येणार नाही, हा आक्रोश कायम राहील. महाराष्ट्रात रोज एखादी चिमुरडी बळी जातेय. आज पुन्हा बीड जिल्ह्यातील शिरूर-कासार येथे साडेपाच वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले. तेथे गावकऱ्यांनी पैसे देऊन तडजोड लावली, हॉस्पिटलनेही प्रकरण दाबले. अशा सर्वांवर POCSO कायद्यांतर्गत कडक कारवाई झाली पाहिजे.” धुळे, नाशिक, नंदुरबार, सोनगीर, खोरदर्ड, मोरदर्ड, वडेल अशा डोंगराळ भागांत सातत्याने अल्पवयीन मुलींचे बळी जात असल्याचे सांगत नेत्यांनी राज्य सरकारवर कडवी टीका केली. “एकिकडे डोंगराळे गाव शोकसागरात बुडालेला असताना दुसरीकडे मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्यासारखे संवेदनशील नेते पत्नीच्या विनाविरोध निवडीचा जल्लोष डीजेवर गुलाल उधळत साजरा करत होते. यापेक्षा मोठा दुर्दैव काय?” असा सवाल उपस्थित करून त्यांनी राज्य सरकारला निर्दयी ठरवले.
गृहमंत्र्यांनाही लक्ष्य केले “गृहमंत्री बिहारमध्ये प्रचाराला जातात, नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकीच्या सभाच सोडत नाहीत; पण डोंगराळे गावात येऊन पीडित कुटुंबाच्या डोक्यावरून हात फिरवायलाही वेळ नाही. त्यांची मुलगी मंचावर सूत्रसंचालन करताना नीता अंबानी कौतुक करत होत्या, तेव्हा आमचा उर अभिमानाने भरला होता. पण ही यज्ञा (पीडित चिमुरडी) मोठी झाली असती तर तिलाही असे मंच मिळाले असते, देशसेवा करता आली असती,” अशा शब्दांत भावना व्यक्त करीत गृहमंत्र्यांना आव्हान दिले की, “महाराष्ट्रात किती चिमुरड्या लैंगिक अत्याचारात बळी पडल्या याचा आकडा जाहीर करण्याची हिम्मत आहे का?”
“बेटी बचाव, बेटी पढाव” चे बोर्ड पुसले, “बेटी मिटाव” सुरू
“गावागावांत विकृत मानसिकतेचे लोक पिसाळलेल्या कुत्र्यांसारखे ओळखले जातात. त्यांना वेळीच ठेचण्यासाठी नवे धोरण आणा. धर्म-मंदिर महत्त्वाचे, लेकरं चुरगळली तरी चालते असे सरकारचे धोरण दिसते. लवकरात लवकर ठोस कायदा व कारवाई नाही तर देशव्यापी आंदोलन उभारू,” असा इशारा देण्यात आला.
मालेगाव येथील संतप्त नागरिकांनी कोर्टावर धाव घेऊन निषेध व्यक्त केला. मात्र पोलिसांनी २५० हून अधिक नागरिकांवर सरकारी कामात अडथळा, दंगल असे गंभीर गुन्हे दाखल केले. “लोकांच्या संतापाचा आदर करा, हे FIR तात्काळ रद्द करा,” अशी मागणी करण्यात आली.
या वेळी ऑल इंडिया पँथर सेनेचे दीपक भाई केदार, मनमाड शहराध्यक्ष प्रदीप भाईजी साळवे, लोकशाही धडक मोर्चाचे नाशिक जिल्हाध्यक्ष शेखर दादा पगार, संविधान आर्मीचे अनिल भाऊ जाधव, सुनीताताई महिरे, वहाब भाई खान, भारत भाऊ म्हसदे, बबलू भाऊ मोरे, कृष्णा मामा दुधेकर, विकासभाऊ लहिरे, नानाभाऊ पगारे, बापुभाऊ जगताप, आनंदआण्णा, अजय पिरनाईक, बाळा भाऊ आहिरे, राहुल देवरे, कल्याणअण्णा जाधव, अविनाशभाऊ साळवे, किरणभाऊ बलखंडे, रोहितभाऊ जाधव, शामभाऊ साळवे, नंदू डावरे, गणेश जाधव, अर्जुन शिंपी, वाणी बाबा, गोरख सोनावणे, सम्राट जाधव आदींसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. “आरोपीला लवकरात लवकर फाशी देऊन देशात ठोस संदेश द्या, जेणेकरून पुन्हा एकही चिमुरडी बळी पडणार नाही,” अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या