Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मुस्लिम लायब्ररी मनमाडमध्ये डॉ. ए. पी. जे. कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा


मनमाड येथील मुस्लिम लायब्ररीत भारताचे माजी राष्ट्रपती व भारत रत्न डॉ. ए. पी. जे. कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मुस्लिम लायब्ररीचे सचिव अब्दुल कादर भाई यांनी भूषवले, तर माजी नगरसेवक व इकरा हायस्कूलचे संचालक नजमुल हुसैन मन्सुरी आणि इम्तियाज सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  

कार्यक्रमात नजमुल हुसैन आणि इम्तियाज सर यांनी डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनावर मनोगत व्यक्त केले. सौ. सलमा मॅडम यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस फुलहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी हाजी जानी शेठ, शाहबाज भाई आणि इकरा गर्ल्स उर्दू हायस्कूलच्या विद्यार्थिनींसह अनेक वाचक उपस्थित होते. इकरा हायस्कूलचे प्राचार्य अफजल सर आझमी यांचीही विशेष उपस्थिती होती.  

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. सलीम अहमद यांनी केले, तर अब्दुल कादर भाई यांनी सर्व उपस्थित विद्यार्थिनी आणि वाचकांचे मुस्लिम लायब्ररीतर्फे आभार मानले. हा कार्यक्रम वाचन संस्कृतीला चालना देणारा आणि डॉ. कलाम यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणारा ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या