मनमाड, 19 सप्टेंबर 2025 : पंजाबमध्ये अलीकडेच झालेल्या पुरामुळे हजारो कुटुंबे बेघर झाली असून, त्यांच्यावर उपासमार आणि निवाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या आपत्तीग्रस्त बांधवांसाठी मदतीचा हात देण्याचा निश्चय जमीयत उल्मा-ए-हिंद यांनी केलेला आहे. जमीयत उल्मा-ए-हिंद मनमाड यांनी शुक्रवार नमाजानंतर शहरातील सर्व मस्जिदींमध्ये विशेष मदत संकलन मोहीम राबविण्यात आली. शहरातील मुस्लिम बांधव, व्यापारी, तरुणाई, व ज्येष्ठ नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे योगदान देत आपले सामाजिक भान जिवंत असल्याचे दाखवून दिले. अनेकांनी मोठी रोख रक्कम दिली.
जमीयतचे उल्मा ए हिंद मनमाड पदाधिकारी, व स्वयंसेवकांनी मस्जिदीत फिरून लोकांना आपत्तीग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले. अल्पावधीतच भरघोस रक्कम जमा झाली. सर्व देणग्या पारदर्शक पद्धतीने नोंदवून त्यांची अधिकृत यादी तयार करण्यात आली आहे.
मनमाड जमीयतच्या प्रतिनिधींनी सांगितले की, “मानवी दु:खाच्या काळात धर्म, प्रांत किंवा जातीपंथ न पाहता एकमेकांना मदत करणे ही खरी इबादत आहे. मनमाडकरांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पंजाबमधील बांधवांना मोठा दिलासा देईल.” या मोहिमेत मदरशातील विद्यार्थीही सामील झाले होते. काही विद्यार्थ्यांनी आपल्या खिशातून मिळालेली बचत देऊन ‘दया आणि करुणा हीच खरी संपत्ती आहे’ हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.
जमीयत उल्मा-ए-हिंद मनमाडच्या वतीने संकलित मदत पुढील काही दिवसांत मालेगाव येथील जिल्हा कार्यालय मार्फत पंजाबमधील पूरग्रस्त भागात पोहोचविण्यात येईल.
या उपक्रमामुळे मनमाड शहर मुस्लिम बांधवांनी पुन्हा एकदा मानवतेच्या सेवेचा दीप प्रज्वलित केल्याचे दिसून आले तर “जगात जेथे दु:ख आहे, तेथे जमीयत उल्मा ए हिंदचा हात पोहोचवू” हा संदेश मनमाड जमीयत उल्मा ए हिंद ने दिला आहे.
या मोहिमेत मनमाड जमीयत उल्मा ए हिंद चे अध्यक्ष मौलाना तौसिफ़ आलमगिरी, उपाध्यक्ष, मुफ्ती शाकीब साहेब.ईशाअती, मुफ्ती मोहम्मद आसीम साहेब मुलतानी, जावेद शेख (ईमेज) जरनल सचिव,कादीर शेख, सचिव, इमरान गुलशर खान,हुजेफा शकिल अहेमद, शेख शकील अंसार,खजिनदार मतीन लतीफ तांबोळी, उप खजिनदार शकील शेख,सोशल मीडिया प्रमुख फिरोज शेख, सदस्य,मौलाना कामील.हाफिस साजिद (रहेमत मस्जिद)हाफिज आसिफ, सैय्यद कयाम , इमरान कादरी.आरिफ खान,वसीम खान, सलीम शेख, हाजी इकबाल,मुजम्मील राठोड,इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या