हजरत निजामुद्दीन ते कल्याण दरम्यान धावणाऱ्या मंगला एक्सप्रेसमध्ये A1 कोचमध्ये एका अल्पवयीन बालिकेवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या संशयित तरुणाला मनमाड रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. मध्यप्रदेशातील एका सरकारी कर्मचाऱ्याच्या कुटुंबासमोर ही घटना घडली, जेव्हा रात्रीच्या वेळी वरच्या बर्थवर झोपलेल्या बालिकेशी संशयिताने गैरकृत्याचा प्रयत्न केला. मुलीच्या विरोधानंतर तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न करत संशयिताने पळ काढला, परंतु मुलीच्या वडिलांनी पाठलाग करत त्याला पॅन्ट्री कारजवळ पकडले. रेल्वे सुरक्षा बलाच्या मदतीने संशयिताला मनमाड रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मनमाड रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात छेडखानी आणि पोस्को कायद्यांतर्गत (कलम 74) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताला मालेगाव जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षिका जोगदंड करत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या