Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानावर बुलडोझर चालवण्याची संतापजनक घटना – सिन्नर तालुक्यातील मिठ सागरे ग्रामपंचायतच्या दोषींवर तात्काळ कारवाई व्हावी

 


सिन्नर (जि. नाशिक), सिन्नर – तालुक्यातील मिठ सागरे गावात एक अत्यंत संतापजनक व दु:खदायक घटना घडली आहे. येथील ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांनी स्थानिक मुस्लिम बांधवांना विश्वासात न घेता तसेच त्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता, मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना पायदळी तुडवत,कबरस्तानामध्ये जेसीबी चालवली. या क्रूर कृतीत अनेक कबरी जमीनदोस्त करण्यात आल्या, एक ही कबर ही दिसत नाही. ज्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.


मृतांच्या स्मृती व श्रद्धास्थानांचा असा अपमान करणं ही अत्यंत निंदनीय व अमानवी कृत्य आहे. संबंधित सरपंच व ग्रामसेवकांनी कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया न पाळता, धार्मिक समुदायाच्या भावनांना धक्का देणारा निर्णय घेतला आहे.


या अमानवी कृतीचा मुस्लिम बांधवांतर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानिक नागरिक व समाजबांधवांनी प्रशासनाकडे तात्काळ याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषींवर निलंबनाची तसेच फौजदारी स्वरूपात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.तसेच, सामाजिक सलोखा व धार्मिक सहिष्णुता अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि धर्मसहिष्णुतेसाठी कार्य करणाऱ्या संघटनांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.
लवकरच या गांभीर्य घटने विरुद्ध जिल्हा परिषद नाशिक येथे उपोषणास करणार असल्याचे सांगण्यात आले आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या