मालेगाव, दि. ०८ जून २०२५: नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने मालेगाव तालुक्यातील दाभाडी शिवारातून चोरीस गेलेल्या बोलेरो पिकअप वाहनाचा छडा लावत सराईत चोरट्याला अटक केली आहे. या कारवाईत १ लाख ३५ हजार रुपये किमतीचे चोरीचे वाहन हस्तगत करण्यात यश आले आहे. या यशस्वी कारवाईमुळे स्थानिक गुन्हे शाखेचे कौतुक होत आहे.
दिनांक २४ मे २०२५ रोजी मालेगाव तालुक्यातील दाभाडी शिवारातून फिर्यादी सचिन भगवान सूर्यवंशी (रा. मुंगसे, ता. मालेगाव) यांच्या मालकीच्या रॉयल किंग चक्की आटा कंपनीच्या बोलेरो पिकअप वाहनाची (क्रमांक: MH-18-AA-3265) चोरी झाली होती. याप्रकरणी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात भा.दं.वि. संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल (गु.र.नं. १३३/२०२५) करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास करताना तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदाराच्या खबरीवरून चोरीचे वाहन मालेगाव शहराच्या दिशेने गेल्याचे समजले. यानंतर पथकाने सखोल तपास करत मड्डे हॉटेल परिसरात सापळा रचून संशयित आसिफ इकबाल सैफ अहमद (वय ३२, रा. रमजानपुरा, मालेगाव) याला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान, आसिफने दाभाडी शिवारातून सदर पिकअप चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचे वाहन जप्त करण्यात आले असून, त्याला पुढील तपासासाठी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यास हजर करण्यात आले आहे.
आसिफ इकबाल हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी वाहन चोरी आणि इतर चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या कारवाईने परिसरातील वाहन चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांना आहे.
पोलीस पथकाचे नेतृत्व आणि मार्गदर्शन
ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक (मालेगाव) तेगबीर सिंह संधू आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (मालेगाव कॅम्प) सुरज गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, पोउनि दत्ता कांभीरे यांच्यासह पोलीस अंमलदार सुभाष चोपडा, दत्ता माळी, भुषण आहिरे, कैलास चोथमल, हेमंत गिलबिले आणि प्रदिप बहिरम यांच्या पथकाने या गुन्ह्याचा उलगडा केला.
नागरिकांना आवाहन
नाशिक ग्रामीण पोलीसांनी नागरिकांना आपली वाहने सुरक्षित ठिकाणी लावण्याचे आणि चोरीपासून संरक्षणासाठी योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच, संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे सांगितले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या