Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

नाशिकच्या सोयगांव ग्रामपंचायतीत घोटाळा: बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणी ग्रामसेवक अडचणीत, फौजदारी कारवाईची मागणी



नांदगाव तालुक्यातील सोयगाव ग्रामपंचायतीत 2017 मध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी तात्कालीन ग्रामसेवकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी तक्रार समोर आली आहे. 

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा नांदगाव शहराध्यक्ष अभिषेक अशोक विघे यांनी 1 एप्रिल 2025 रोजी गट विकास अधिकारी पाठक यांच्याकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, कु. स्वराज्य प्रेम निकम यांना 9 नोव्हेंबर 2017 रोजी ग्रामसेवकाने जन्म दाखला दिला, परंतु 2017 च्या रजिस्टरमध्ये याबाबत कोणतीही नोंद आढळली नाही.

गट विकास अधिकारी पाठक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी सोयगाव ग्रामपंचायतीला लेखी अहवाल सादर करण्यास सांगितले असून, सदर दाखला कोणत्या आधारावर दिला गेला, याची पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, 22 जानेवारी 2017 ते 20 डिसेंबर 2017 या कालावधीत कोणते ग्रामसेवक कार्यरत होते, याची माहितीही मागवली आहे.

अभिषेक विघे यांनी सांगितले की, "ही शासनाची फसवणूक करणारी गंभीर बाब आहे. बनावट दाखल्यामुळे अनेक गैरप्रकार घडू शकतात. यामुळे दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे." गट विकास अधिकारी पाठक यांनी या प्रकरणात आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
या प्रकरणामुळे सोयगाव ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, चौकशीतून सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या