Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड शहर पोलिसांची मोठी कारवाई; पेट्रोलियम पाइपलाइन चोरीच्या टोळीचा पर्दाफाश, ५ जणांना अटक

 


नाशिक, दि. ११ जून २०२५:मनमाड शहर पोलीस स्टेशन हद्दीतील अनकवाडे शिवारात मुंबई-मनमाड-बिजवासन उच्च दाब भुमिगत पेट्रोलियम पाइपलाइनला छिद्र पाडून पेट्रोल-डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा मनमाड शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, तीन जणांचा शोध सुरू आहे. गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे यशस्वी कारवाई केली.

गुन्ह्याचा उलगडा:

दिनांक ६ मे २०२५ रोजी अनकवाडे शिवारात चैनेज (सो.एच) २४३.३०० किमी जवळ पाइपलाइनला क्लॅम्प बसवून छिद्र पाडल्याचा प्रकार उघडकीस आला. बी.पी.सी.एल. इन्टॉलेशन पानेवाडीचे प्रबंधक अनुज नितीन धर्मराव यांच्या तक्रारीवरून मनमाड शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक २७६/२०२५ नोंदवला गेला. भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०२(२), ६१(२) तसेच पेट्रोलियम आणि खनिज वाहक नळ अधिनियम १९६२ चे कलम १५, १६ अंतर्गत हा गुन्हा दाखल झाला.
आरोपींची अटक आणि तपास:

पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपासाला गती देत गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींना पकडले.

 

अटक करण्यात आलेले आरोपी खालीलप्रमाणे:

1. सुनिल उर्फ सोनु जयशंकर तिवारी (वय ३५, कल्याण, ठाणे)

2. कथुरावन उर्फ कार्तिक रामकृष्ण मुदलियार (वय ३८, गोवंडी, मुंबई)

3. मोहम्मद मकसूद अब्दुल वाहीद शेख (वय ४०, गोवंडी, मुंबई)

4. इरफान याकुब मोमीन (मनमाड, नाशिक)

5. काकासाहेब शिवराम गरुड (अनकवाडे, नाशिक)

याशिवाय, वाहीद सदार सैय्यद, याकुब शेख आणि अमजद कुरेशी (सर्व रा. मुंबई) यांची नावे निष्पन्न झाली असून, त्यांचा शोध सुरू आहे. अटक आरोपींपैकी सुनिल तिवारी आणि इरफान मोमीन यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.

तपासातील प्रगती:

पोलिसांनी आरोपींकडून चोरीचे नेमके प्रमाण, विक्रीचे मार्ग, वाहतूक साधने आणि इतर ठिकाणी अशा चोऱ्यांची माहिती मिळवण्यासाठी तपास सुरू ठेवला आहे. पाइपलाइनला छिद्र पाडण्यासाठी वापरलेले क्लॅम्प, जी.आय. पाइप आणि व्हॉल्व्ह यांचा वापर कसा झाला, याचाही तपास सुरू आहे.

पोलीस पथकाची कामगिरी:

या कारवाईत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय करे, सहायक पोलीस निरीक्षक कौशलरामनिरंजन वाघ, पोहवा राजेंद्र केदारे, पंकज देवकाते, प्रल्हाद सानप, अशोक व्यापारे, संदीप झाल्टे, रणजित चव्हाण, राजेंद्र खैरणार तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे हेमंत गिलबिले आणि प्रदिप बहीरम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मनमाड शहर पोलिसांच्या या यशस्वी कारवाईबद्दल नागरिकांतून कौतुक होत आहे. पेट्रोलियम पाइपलाइन चोरीसारख्या गंभीर गुन्ह्याचा तपास करून टोळीचा पर्दाफाश करणाऱ्या पथकाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या