शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मनमाड वीज वितरण कंपनीच्या भोंगळ्या कारभाराविरोधात जाहीर निषेध
मनमाड शहरातील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ्या कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले असून, चोवीस तास वीज पुरवठा खंडित होत आहे. घरगुती ग्राहकांपासून ते व्यावसायिक दुकानदारांपर्यंत सर्वांवर याचा गंभीर परिणाम होत आहे. वीज ग्राहकांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी असलेला मनमाड वीज वितरण कंपनीचा दूरध्वनी क्रमांक (०२५९१-२२२३८४) कायम बंद किंवा अनुपलब्ध असतो. याबाबत वारंवार तक्रारी करूनही कोणतीही सुधारणा झालेली नाही.
याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मनमाड वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन केले. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारत या समस्येचे गांभीर्य लक्षात आणून दिले. तसेच, कार्यालयातील टेलिफोनला पुष्पहार घालून आणि अगरबत्ती लावून निषेध व्यक्त केला.
शिवसेना तालुका सचिव शैलेश प्रकाश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, येत्या दोन दिवसांत दूरध्वनी क्रमांक सुरळीत न झाल्यास आणि ग्राहकांच्या तक्रारींचे योग्य निराकरण न झाल्यास, तिसऱ्या दिवशी शिवसेना पक्षाकडून कठोर पावले उचलली जातील. याला सर्वस्वी वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असतील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
या आंदोलनात शहरप्रमुख माधव शेलार, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश अण्णा हिरण, शहर संघटक रवी इप्पर, ज्येष्ठ शिवसैनिक राजाभाऊ आहेर,शहर सचिव न्यानेश्वर नागपुरे यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने नेहमीप्रमाणे वीज ग्राहकांच्या हक्कांसाठी पाठराखण करण्याचे आश्वासन दिले आहे. पक्षाने या प्रश्नावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून, नागरिकांच्या सोयीसाठी वीज वितरण कंपनीने आपली कार्यप्रणाली सुधारावी, असे आवाहन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या