Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड क्रिकेट असोसिएशनतर्फे राजवैभव यांचा जंगी सत्कार.

 

मनमाड, दि. ३१ मे २०२५:महाराष्ट्र संविधान संवाद समितीचे राज्यसचिव राजवैभव शोभा रामचंद्र यांनी नुकतीच मनमाड येथील पंचशील सार्वजनिक वाचनालय, हुडको येथे भेट दिली. कोल्हापूरहून गाळणे (ता. मालेगाव) येथील निवासी शिबिरात संविधानाची माहिती देण्यासाठी आलेले राजवैभव परतीच्या प्रवासात मनमाड येथे थांबले होते. यावेळी मनमाड क्रिकेट असोसिएशनतर्फे त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

मनमाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मनोज ठोंबरे (सर), उपाध्यक्ष देवेंद्र चुनियान, सचिव जाविद मुश्ताक शेख आणि पंचशील वाचनालयाचे सचिव श्री. एस. एम. भाले साहेब यांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ संपन्न झाला. राजवैभव यांच्या संविधान प्रबोधनाच्या कार्याची प्रशंसा करत असोसिएशनने त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

या प्रसंगी मनोज ठोंबरे यांनी सांगितले, “राजवैभव यांचे संविधान प्रबोधनाचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या या भेटीमुळे मनमाड क्रिकेट असोसिएशनला त्यांचा सन्मान करण्याची संधी मिळाली, याचा आम्हाला अभिमान आहे.” राजवैभव यांनीही मनमाड क्रिकेट असोसिएशन आणि पंचशील वाचनालयाच्या कार्याचे कौतुक केले आणि भविष्यात सामाजिक कार्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.

हा सत्कार सोहळा स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला असून, मनमाड क्रिकेट असोसिएशनच्या सामाजिक बांधिलकीचेही कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या