दौंड उपजिल्हा रुग्णालयातील बेशिस्त कारभाराविरोधात नागरिकाची तक्रार; प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी
दौंड, पुणे: दौंड उपजिल्हा रुग्णालयातील बेशिस्त कारभार आणि रुग्णांना होणाऱ्या त्रासाबाबत भिमनगर, दौंड येथील रहिवासी अमर मधुकर जोगदंड यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तक्रार निवेदन सादर केले आहे. या तक्रारीत रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांच्या गैरव्यवहारांवर गंभीर आरोप करण्यात आले असून, याबाबत प्रशासनाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तक्रारीतील प्रमुख मुद्दे:
1. वेळेचे बंधन न पाळणे: निवेदनानुसार, रुग्णालयातील निवासी आणि कायमस्वरूपी डॉक्टर तसेच नर्स वेळेवर कामावर हजर राहत नाहीत. काही कर्मचारी सकाळी 11 नंतर येतात आणि दुपारी 2:30 च्या सुमारास घरी निघून जातात. यामुळे रुग्णांना तासंतास वाट पाहावी लागते. तक्रारकर्त्याने बायोमेट्रिक हजेरी आणि दैनंदिन हजेरी पत्रकाची तपासणी करण्याची मागणी केली आहे.
2. रुग्णांशी दुर्लक्ष आणि तुच्छ वागणूक: गरीब रुग्णांना त्यांच्या आजारांबाबत तपासणी दरम्यान तुच्छतेने वागवले जाते. जखमा, सूज किंवा गुप्तांगावरील आजार दाखवणाऱ्या रुग्णांना डॉक्टर गंभीरपणे घेत नाहीत. रुग्णांनी प्रश्न विचारल्यास त्यांना टाळले जाते किंवा अपमानास्पद उत्तरे दिली जातात.
3. नर्स स्टाफचे गैरव्यवहार: नर्स कर्मचारी रुग्णांपेक्षा मोबाइल फोनवर रिल्स, व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंस्टाग्राममध्ये जास्त व्यस्त असतात. बाळंतपणानंतर महिलांच्या स्वच्छतेची जबाबदारी नर्स नाकारतात आणि नातेवाइकांना घाण, रक्त किंवा कपडे बाहेर फेकण्यास सांगतात, ज्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागतो.
4. अपुरी सुविधा आणि गैरसोय: अॅडमिट रुग्णांचे रक्तदाब (बी.पी.) तपासणी सारख्या मूलभूत चाचण्या खाटेवर न करता दुसऱ्या कॅबिनमध्ये बोलावून केल्या जातात. रुग्णांनी त्रासाबाबत जास्त माहिती विचारल्यास कर्मचारी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात.

0 टिप्पण्या