Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती एच.ए.के. हायस्कूल, मनमाड येथे उत्साहात साजरी.


क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती एच.ए.के. हायस्कूल, मनमाड येथे उत्साहात साजरी.

मनमाड, दि. ११ एप्रिल २०२५: एच.ए.के. हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, मनमाड येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आदराने साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक . भूषण दशरथ शेवाळे, पर्यवेक्षक. अन्सारी शाहिद अख्तर आणि . शेख आरिफ कासम यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. उपशिक्षक. शानूल सुभाष जगताप यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याची आणि त्यांच्या सामाजिक सुधारणांच्या योगदानाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. त्यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही अत्यंत प्रभावीपणे केले. 

मुख्याध्यापक भूषण शेवाळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महात्मा फुले यांच्या शिक्षण आणि समता यावरील विचारांचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. तसेच, संस्थेच्या सदस्या आयशा मो. सलीम गाजियानी यांनीही आपले मौलिक विचार व्यक्त करत विद्यार्थ्यांना फुले यांच्या आदर्शांचे अनुकरण करण्याचा संदेश दिला.

या कार्यक्रमाने उपस्थित सर्वांमध्ये सामाजिक समता आणि शिक्षणाबाबत नवचेतना निर्माण केली. शाळेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या