शिर्डी भिक्षेकरी मृत्यू प्रकरण: पीडितांना न्याय मिळवण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार;ॲड. विक्रांत वाघचौरे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स
शिर्डी, दि. 13 एप्रिल 2025: शिर्डीतील भिक्षेकरी धरपकड मोहिमेदरम्यान झालेल्या चार जणांच्या मृत्यू प्रकरणी पीडितांना जलद न्याय मिळावा यासाठी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स संघटनेचे प्रमुख ॲड. विक्रांत वाघचौरे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे (NHRC) लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची नोंद केस क्रमांक 40035/CR/2025 नुसार झाली असून, NHRC ने महाराष्ट्र शासनाला 10 दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.4 एप्रिल रोजी रामनवमीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत राबवण्यात आलेल्या भिक्षेकरी धरपकड मोहिमेत 50 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. यापैकी चार जणांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांचे नातेवाईकांनी प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, "ते भिक्षेकरी नव्हते, तर मोलमजूरी करणारे मजूर होते," असा दावा केला आहे.
ॲड. वाघचौरे यांनी सांगितले की, "प्रशासनाने भिक्षेकरी म्हणून ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची योग्य तपासणी न करता केवळ कपड्यांच्या आधारे कारवाई केली, ही बाब चुकीची आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही NHRC कडे तक्रार केली आहे
."NHRC च्या या त्वरित दखल घेण्याच्या निर्णयामुळे पीडित कुटुंबियांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. ॲड. वाघचौरे यांनी विश्वास व्यक्त केला की, "राष्ट्रीय मानवाधिकार आयोग गरीब आणि वंचितांना त्वरित व योग्य न्याय देईल
"या प्रकरणामुळे शिर्डीतील भिक्षेकरी धरपकड मोहिमेच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, यापुढे अशा कारवायांमध्ये अधिक पारदर्शकता आणि संवेदनशीलता दाखवली जावी, अशी मागणी होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या