पंचवटी एक्सप्रेस: संस्कृती आणि मानवतेचा तेजोमय प्रवास; ज्ञानेश पिसे,
मनमाड, नाशिक ते मुंबई दररोज चाकरमान्यांना घेऊन जाणारी पंचवटी एक्सप्रेस ही केवळ रेल्वे नाही, तर संस्कृती, परंपरा आणि मानवतेचा अनोखा संगम आहे. नुकतेच या गाडीत बुद्धिमत्तेचे हिमालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंत्या उत्साहात साजऱ्या करण्यात आल्या. या प्रसंगी महापुरुषांच्या मानवतावादी विचारांचा जागर करत, अज्ञानाच्या अंधारातून उजेडाकडे नेणाऱ्या त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.
कसारा घाटातील अंधाऱ्या बोगद्यांतून मार्ग काढत पंचवटी एक्सप्रेस रोज नव्या प्रकाशाकडे प्रवास करते. या जयंती सोहळ्याने हा प्रवास अधिक तेजोमय झाला. गेल्या महिन्यात रमजान पर्वात इफ्तार पार्टीद्वारे सर्वधर्म समभावाचा संदेश देणारी ही गाडी आता "अति दीप भव"च्या संकल्पनेसह संविधानाचा जागर करत मार्गस्थ झाली आहे.
पंचवटी एक्सप्रेस ही फक्त प्रवाशांना गंतव्यस्थानापर्यंत नेणारी रेल्वे नाही, तर आपुलकी, माणुसकी आणि वैचारिक वारशाचा एक अनोखा मंच आहे. नाशिक आणि परिसरातील लोकांसाठी ही गाडी म्हणजे सांस्कृतिक धरोहर आहे, जी महामानवांच्या विचारांचा वारसा जपत आहे. या प्रवासातील प्रत्येक क्षण मानवतेच्या उज्ज्वल भविष्याचा संदेश देतो.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या