बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्याचा शिवसेना मनमाडकडून तीव्र निषेध

मनमाड, दि. २३ एप्रिल २०२५: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात मंगळवार, दि. २२ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अज्ञात दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून केलेल्या भ्याड हल्ल्याचा शिवसेना मनमाड शहराच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. या हल्ल्यात २८ ते ३० पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान प्रणीत जैश-ए-मोहम्मदशी संबंधित टी.आर.एफ. या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.

हा हल्ला भारताच्या सार्वभौमत्वावरील थेट हल्ला असून, अशा फुटीरतावादी आणि दहशतवादी संघटनांचा समूळ नायनाट करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. यासंदर्भात शिवसेना मनमाड शहराच्यावतीने सर्कल अधिकारी झोपले तात्या यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात भारत सरकारने कठोर कारवाई करून या हल्ल्याचा प्रतिशोध घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, जिल्हा संघटक नाना शिंदे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, महेंद्र शिरसाठ, कैलास गवळी, सादिक पठाण, अमिन पटेल, सागर शिरसाठ, महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, शहरप्रमुख संगीताताई बागुल, लाला नागरे, सुभाष माळवतकर, लोकेश साबळे, प्रदीप साळवे, निलेश ताठे, मुकेश थोरात, ऋषिकांत आव्हाड, युनुस शेख, मोहसीन पठाण, किरण भामरे, सागर आव्हाड, जितू पगारे, सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे आदी उपस्थित होते.

शिवसेनेने या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करत जखमींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. तसेच, केंद्र सरकारने तातडीने कठोर पावले उचलावीत, असे आवाहनही केले.