ॲड.विक्रांत वाघचौरे यांच्या मागणीस मोठे यश श्री साईबाबा संस्थान मार्फत चालविली जाणार गोशाळा
शिर्डी ग्रामस्थ व साई भक्तांसाठी हा ऐतिहासिक निर्णय, शिर्डीत लवकरच साईबाबा संस्थान मार्फत गोशाळा चालविली जाणार आहे - ॲड. विक्रांत वाघचौरे
शिर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते व मुंबई उच्च न्यायालयाचे वकील तथा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिए्टस चे संस्थापक अध्यक्ष ॲड.विक्रांत वाघचौरे यांनी महाराष्ट्र राज्याचे मा मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे श्री साईबाबा संस्थान शिर्डी मार्फत गोशाळा चालविण्यात यावी यासाठी जाहीर निवेदन ईमेलद्वारे पाठविले होते त्यावर अपर मुख्य सचिव, पशुसंवर्धन , दुग्धविकास विभाग यांच्याकडे पुढील कारवाहीसाठी प्रकरण पाठविण्यात आले होते, त्यानुसार मा. मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय, मुंबई यांचेकडे ॲड. वाघचौरे यांनी पाठपुरावा करून सदर गोशाळा प्रकल्पास मंजुरी मिळवली त्यानंतर अपर मुख्य सचिव, पशुसंवर्धन , दुग्धविकास विभाग यांचे आदेशानुसार श्री साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीच्या बैठकीत संस्थानचे वतीने देशी गाईची गोशाळा सुरू करण्याचे निर्णयाला मंजुरी मिळाली आहे
पहिल्या टप्प्यात भारतीय वंशाच्या देशी अर्थात गावरान १०० गाई गो -शाळेत दाखल होणार आहेत. या गोशाळेमुळे साई मंदिरात दैनंदिन होणाऱ्या आरती पूजाअर्चासाठी लागणारे गावरान गाईचे शुद्ध दूध व तूप तसेच द्वारकामाईतील पेटत्या धुनीसाठी शेणाच्या गवऱ्या उपलब्ध होणार आहेत.
यामाध्यमातून साईबाबा संस्थान गोशाळा सुरू करून देशभरात गोमाता रक्षणाचा महत्वपूर्ण संदेश पोहचवणार जाणार आहे. भारतीय वंशाच्या देशी गावरान गाईंची गोशाळा सुरु करण्याचा तदर्थ समितीचा निर्णय स्वागताहार्य आहे. या निर्णयांमुळे गोरक्षणाचे महत्व तसेच आपल्या संस्कृतीत गोमातेला असलेले अध्यात्मिक दृष्ट्या असणारे महत्त्वपूर्ण स्थान पावाचत अधिक जनजागृती होण्यास अधिक मदत होईल तसेच परिसरातील युवकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती निवेदन कर्ते ॲड. विक्रांत वाघचौरे यांनी दिली.
साई बाबा संस्थान मार्फत गोशाळा सुरू झाल्यानंतर भारतीय वंशांच्या गायीचे संवर्धन होईल,
द्वारकामाई धुनीत टाकण्यासाठी गायीच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या याचाही खर्च मोठा असतो या खर्चात गोशाळेमुळे बचत होणार आहे. साईबाबा संस्थानच्या लाडू प्रसादासाठी लागणारे देशी गावरान गाईचे शुद्ध तूप उपलब्ध होईल त्यामुळे लाडू प्रसादाचा दर्जा व क्वालिटी अधिक वाढेल, तसेच इतर दुग्धजन्य पदार्थही अधिक शुद्ध व भेसळ विरहित प्राप्त होतील. श्री साईबाबा संस्थानने गोशाळा उभारणीस प्रोत्साहन दिल्यानंतर साई भक्तांकडूनही मोठी देणगीरूपी मदत या प्रकल्पामुळे होईल.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या